शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:21 IST

गांधीनगर : उचगाव व परिसरात जुन्या साड्यांवर केमिकलचा वापर करून त्या पंचगंगा नदीपात्रामध्ये धुतल्या जात असल्याने पंचगंगा नदी ...

गांधीनगर : उचगाव व परिसरात जुन्या साड्यांवर केमिकलचा वापर करून त्या पंचगंगा नदीपात्रामध्ये धुतल्या जात असल्याने पंचगंगा नदी प्रदूषित होत आहे. त्यामुळे नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी करवीर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे केली. निवेदनात म्हटले आहे की, उचगाव, चिंचवाड परिसरात जुन्या साड्यांची गोदामे आहेत. या साड्या रात्री-अपरात्री केमिकलच्या साहाय्याने नदीच्या पाण्यात धुतल्या जातात. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते. धुतलेल्या साड्या प्रेस करून नव्याने दुकानात विक्रीसाठी ठेवल्या जातात. त्यामुळे ग्राहकांचीही फसवणूक होते. केंद्र व राज्य शासन पंचगंगा नदी प्रदूषण होऊ नये म्हणून कोट्यवधीचा निधी व उपाययोजना, जनजागृती करत असताना काही समाजकंटक जुन्या साड्या केमिकलच्या साहाय्याने धुऊन पंचगंगा नदीमध्ये प्रदूषण करत आहेत. त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. यापूर्वीही करवीरच्या तहसीलदार यांच्याकडे यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने केली. प्रांताधिकारी यांच्यावतीने स्वीय सहायक संजय घोरपडे यांनी निवेदन स्वीकारले. शिष्टमंडळात करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, संतोष चौगुले, दिलीप सावंत, दीपक पोपटानी, दीपक अंकल, सुनील पारपाणी, योगेश लोहार, अजित चव्हाण, भूषण चौगुले, अजित पाटील, ओंकार जोशी, अकबर फकीर यांचा समावेश होता.

फोटो २० गांधीनगर नदी प्रदूषण

ओळ:- उचगाव व चिंचवाड परिसरात पंचगंगा प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करा या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून स्वीकारताना प्रांताधिकारी यांचे स्वीय सहायक संजय घोरपडे, तालुका प्रमुख राजू यादव शिवसैनिक. तालुकाप्रमुख राजू यादव यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.