शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित घेणे .... हुल्लडबाजांसह विनामास्क चालकांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:21 IST

कोल्हापूर : रंगपंचमी व वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. ...

कोल्हापूर : रंगपंचमी व वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. यात दिवसभरात ७७० जणांवर विविध विनामास्क, हुल्लडबाजी आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

रंगपंचमीनिमित्त शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्यातील प्रत्येक चौक, महत्त्वाचे मार्ग, गर्दीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दंगा-मस्ती करत फिरणाऱ्या हुल्लडबाजांची पोलिसांनी धरपकड केली. नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई झाली. यात विनामास्क फिरणाऱ्या ५०० जणांवर दंडात्मक, तर हुल्लडबाजी करणाऱ्या ७० युवकांना ताब्यात घेऊन सोडण्यात आले. याशिवाय दोन शेजणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

गेल्या तीन वर्षांत रंगपंचमी खेळताना इचलकरंजीत वादावादी व हाणामारीचे प्रकार घडले होते. जिल्ह्यात पूर्वी घडलेल्या घटनांची माहिती घेऊन ज्या त्या गावांत, शहरांत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील प्रत्येक चौकात नाक्यावर पोलीस थांबून वाहनधारकांची चौकशी करीत होते. रंग उधळून धिंगाणा घालणारे, मोठ्याने ओरडत फिरणाऱ्यांना पकडून कारवाई केली जात होती. विविध पोलीस ठाण्यांतर्गत एकूण २०० नोंदीत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. शहरात प्रवेश करणाऱ्या तावडे हॉटेल, ताराराणी चौक, दाभोलकर कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, शिवाजी पूल, वडणगे फाटा, कसबा बावडा, राजारामपुरी, सायबर चौक, विद्यापीठ परिसर, कळंबा चौक, मंगळवार पेठ, बिनखांबी गणेश मंदिर, शिवाजी पेठ, लक्षतीर्थ वसाहत, सानेगुरुजी वसाहत रस्ता याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

जागोजागी छेडछाडविरोधी पथके तैनात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील गल्लीबोळांतून पोलीस व्हॅन, दुचाकीवरून गस्त घातली. यात गर्दी टाळण्यासह मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्स ठेवा, अशा सूचना केल्या जात होत्या. बीट मार्शलची वाहनेही गस्तीत सहभागी होती. जल्लोषी वातावरणात हाणामारी, महिला, तरुणींची छेडछाड रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस पथके तैनात करण्यात आली होती.

चौकट

मोटर वाहन कायद्याप्रमाणे शहर वाहतूक शाखेने केलेली कारवाई अशी,

एकूण केसेस - ९२८

ट्रिपल सीट - १३८

एकेरी मार्ग नियमभंग - १२२

दंड वसूल - ८८ हजार ८००