शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’कडून ‘हेमरस’चे व्यवस्थापन धारेवर

By admin | Updated: November 28, 2014 00:13 IST

राजेंद्र गड्ड्यान्नावर : ऊसदराबाबत तोडगा न निघाल्यास उद्यापासून ऊस वाहतूक रोखणार

चंदगड : चंदगड तालुक्यातील हेमरस व इको शुगर केन साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ न करता उत्पादन खर्चाच्या आधारावर दर द्यावा व गेल्या वर्षाचा ३८० रुपयांचा हप्ता द्यावा, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राजगोळी खुर्द येथे रास्ता रोको केला. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करून त्यांना चांगलेच धारेवर धरले. दोन दिवसांत ऊसदराबाबत निर्णय न झाल्यास शनिवार (दि. २९)पासून ‘हेमरस’ला होणारी ऊस वाहतूक रोखण्याचा इशाराही देण्यात आला.‘स्वाभिमानी’चे तालुकाप्रमुख राजेंद्र गड्ड्यान्नावर यांच्या नेतृत्वाखाली राजगोळी खुर्द येथे झालेल्या आंदोलनात गड्ड्यान्नावर यांनी कारखाना प्रशासनाला इशारा देताना ऊसदराबाबत ‘एफआरपी’ची अट मान्य नसल्याचे सांगून स्वामीनाथन समितीने सूचविलेल्या उत्पादन खर्चाच्या आधारावर दर देण्याची मागणी केली. एफ.आर.पी.पेक्षा जादा दर देणे कारखान्याला शक्य असल्याचे गड्ड्यान्नावर यांनी आकडेवारीसह स्पष्ट केले. येत्या दोन दिवसांत कारखान्याने याबाबत निर्णय न घेतल्यास कारखान्याला होणारी ऊस वाहतूक रोखण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.यावेळी नवनीत पाटील, प्रा. दीपक पाटील, लक्ष्मण कडोलकर यांनी मनोगत व्यक्त केले. ‘हेमरस’च्या वतीने भूमिका मांडताना कंपनी एच. आर. भरत कुंडल यांनी कारखान्याने ‘एफआरपी’प्रमाणे दर जाहीर केल्याचे सांगून गेल्यावर्षीचा राहिलेला ३८० रुपयांचा हप्ता सॉफ्ट कर्ज मिळाल्यानंतर देण्यात येईल, असे सांगून कारखान्याच्या वजन काट्यात कोणताही दोष नसल्याचे सांगितले.