शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

कपिलतीर्थ मंडईतील १३० विक्रेत्यांची स्वॅब तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:22 IST

कपिलतीर्थ मंडईतील १३० विक्रेत्यांची स्वॅब तपासणी लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शहरातील फेरीवाले, भाजी विक्रेते यांना ‘आरटीपीसीआर’ व लसीकरण ...

कपिलतीर्थ मंडईतील १३० विक्रेत्यांची स्वॅब तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शहरातील फेरीवाले, भाजी विक्रेते यांना ‘आरटीपीसीआर’ व लसीकरण पूर्ण करून घेण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाने दिल्या आहेत. त्यानुसार सोमवारपासून कपिलतीर्थ मार्केट येथे ४५ वर्षाच्या आतील १३० फळ, भाजी विक्रेते व फेरीवाल्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.

शहरातील अन्य भाजी मंडईतील फेरीवाल्यांना महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात तपासणीसाठी पाठविण्यात आले. ४५ वर्षांवरील विक्रेत्यांना लसीकरण करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, अतिक्रमण पथकप्रमुख पंडित पोवार, आरोग्य निरीक्षक गीता लखन व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचारी उपस्थित होते.

बातमी क्रमांक २ -

५६ व्यक्तींवर कोरोना प्रतिबंधात्मक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून सोमवारी महानगरपालिका, केएमटी आणि पोलीस पथकाने कोविडसंदर्भातील नियम तोडणाऱ्या ५६ लोकांवर कारवाई करून त्यांच्याकडून २८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र शहरात नागरिक या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याचे लक्षात आल्यानंतर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

बातमी क्रमांक ३ -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात औषध फवारणी

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने शहरात भाजी मार्केट, मुख्य चौक व वर्दळीच्या ठिकाणी सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे. याबाबत उपआयुक्त निखिल मोरे यांनी मुख्य आरोग्य निरीक्षक यांना शहरातील वर्दळीच्या ठिकाणी आरोग्य विभागाच्यावतीने चार ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी शहराच्या मध्यवस्तीत तसेच उपनगरांतून ही औषध फवारणी करण्यात आली.

बातमी क्रमांक ४ -

महापालिकेतर्फे १३६८ घरांचे सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांच्या साहाय्याने घराघराचे सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले. सोमवारी ११ नागरी आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या भागातील १३६८ घरातील ५४४३ नागरिकांची तपासणी करण्यात आली.

या तपासणीमध्ये १८२ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले; तर २९३ नागरिकांना ताप, सर्दी, खोकल्याची लक्षणे आढळून आली. यापैकी ३४ नागरिकांमध्ये लक्षणे आढळल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी व सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले.