राष्ट्रीय क्रमवारीत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:28 IST2021-09-15T04:28:35+5:302021-09-15T04:28:35+5:30

केंद्रीय मनुष्यवळ विकास मंत्रालयातर्फे देशात राबविण्यात आलेल्या “नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंंग फेमवर्क" (एनआयआरएफ) च्या कमवारीत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, ...

Success of Bharti University College of Pharmacy in National Rankings | राष्ट्रीय क्रमवारीत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे यश

राष्ट्रीय क्रमवारीत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे यश

केंद्रीय मनुष्यवळ विकास मंत्रालयातर्फे देशात राबविण्यात आलेल्या “नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंंग

फेमवर्क" (एनआयआरएफ) च्या कमवारीत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूरने देशात

४९ वे तर राज्यात ०८ वे स्थान मिळविले. राष्ट्रीय क्रमवारी यादीमध्ये सलग सहा वेळा स्थान पटकाविलेले शिवाजी विद्यापीठ संलग्नित एकमेव फार्मसी महाविद्यालय आहे.

भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रेरणेने महाविद्यालयाने शिक्षण, संशोधन व

सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची ही पोचपावती असल्याचे तसेच डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. विश्वजित कदम, डॉ. एच. एम. कदम, तसेच पालक, विद्यार्थी व उद्योजक या सर्वांच्या पाठबळामुळे हे यश मिळाले आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे यांनी केले. तसेच नॅशनल बोर्ड

ऑफ अॅकिडिटेशन', नवी दिल्ली (एन.वी.ए) चे दोन वेळा मानांकन मिळालेले शिवाजी विद्यापीठ कार्य क्षेत्रातील एकमेव फार्मसी महाविद्यालय आहे. महाविद्यालयाची नोंदणी विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) च्या १२ (व) २ (फ) या यादीत समाविष्ट झाल्याने आजपर्यंत महाविद्यालयास एक कोटी रुपयांंचा संशोधन निधी मिळालेला आहे. हे महाविद्यालय शिवाजी विद्यापीठ व भारती विद्यापीठाचे मान्यताप्राप्त पीएच.डी. संशोधन केंद्र आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे, उपप्राचार्य डॉ. एम . एस .भाटीया तसेच एनआयआरएफचे मुख्य समन्वयक डॉ. एन. आर. जाधव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्याचे संस्थेचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. एच. एम. कदम यांनी या महाविद्यालयाच्या यशाबद्दल

अभिनंदन केले.

Web Title: Success of Bharti University College of Pharmacy in National Rankings