शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

‘विबग्योर’च्या विद्यार्थ्यांनी अनुभवले ‘युनो’तील कामकाज

By admin | Updated: July 5, 2016 00:50 IST

मॉडेल युनायेटड नेशन्स् : ६० शाळांमधील ५०० जणांचा सहभाग; विविध प्रश्नांवर चर्चा

कोल्हापूर : विबग्योर मॉडेल युनायेटड नेशन्सच्या (व्हीएचएमयुएन) माध्यमातून संयुक्त राष्ट्रसंघातील (युनो) कामकाजाचा कोल्हापुरातील विबग्योर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला. त्यात त्यांनी विविध देशांचे प्रतिनिधित्व करत जगासमोरील दहशतवाद, अणुचाचणी, आदी प्रश्नांवर मते मांडली.‘विबग्योर’तर्फे आयोजित सलग सहाव्या वर्षाचे व्हीएचएमयुएन मुंबईत दि. २३ ते २५ जूनदरम्यान घेण्यात आले. त्यात विविध ६० हायस्कूल व महाविद्यालयांतील पाचशे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. त्यात कोल्हापुरातील विबग्योर हायस्कूलमधील नववी व दहावीतील एकूण १९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात सात विद्यार्थिनी होत्या. या विद्यार्थी-विद्यार्थिनी संयुक्त राष्ट्रसंघातील सुरक्षा समिती, आपत्ती व्यवस्थापन, आर्थिक व सामाजिक, मानवी हक्क अशा समितींमध्ये सहभागी झाल्या. त्यांनी या समितींच्या माध्यमातून इराक, इराण, जर्मनी, श्रीलंका आदी देशांचे प्रतिनिधीत्व करत दहशतवाद, अणुचाचणी, जागतिक तापमानवाढ यासह विविध प्रश्नांवर मते मांडली शिवाय अन्य देशांचे प्रतिनिधीसमवेत चर्चा करून काही उपाय सुचविले. यासाठी त्यांना प्राचार्य टी. बालन व अन्य शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, ‘व्हीएचएमयुएन’मधील सहभागाबाबत विबग्योर हायस्कूलमधील अद्वैत करमळकरने सांगितले की, या उपक्रमातील सहभागामुळे माझा आत्मविश्वास वाढला. आपली मते कोणत्याही वादाशिवाय इतरांना कशी पटवून द्यावयाची हे समजले. श्रेयस बिरादारने चांगला अनुभव, जगभरातील घडामोडी, विविध क्षेत्रांतील नवनवीन गोष्टी आणि संवाद कौशल्याचे महत्त्व समजल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)व्यक्तिमत्त्व विकासाला बळ‘व्हीएचएमयुएन’ने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत आहे. त्यांच्यातील नेतृत्वगुण, संवाद व लेखनकौशल्यांद्वारे व्यक्तिमत्त्व विकासाला बळ देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे कोल्हापुरातील विबग्योर हायस्कूलचे प्राचार्य टी. बालन यांनी सांगितले. ते म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून कोल्हापूरचे विद्यार्थी सहभागी होत आहेत. वर्षागणिक त्यांची संख्या वाढत आहे. त्यांचे सादरीकरण चांगले व्हावे यासाठी दोन महिने तयारी करून घेतली जाते. ‘व्हीएचएमयुएन’मध्ये विविध प्रश्नांवर मते मांडण्याची माहिती ते स्वत: संकलित करतात. त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडते. व्हीएचएमयुएनप्रमाणेच व्हिवा, ग्रीन क्लब, आदी उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविले जातात.