गुणवत्तेसाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:37 IST2021-02-23T04:37:39+5:302021-02-23T04:37:39+5:30

येथील रोटरी क्लब सेंट्रल व इंटरॅक्ट क्लबच्या वतीने सरस्वती हायस्कूलमध्ये ‘लेखक आपल्या भेटीला’ हा उपक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते ...

Students should strive for quality | गुणवत्तेसाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी

गुणवत्तेसाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी

येथील रोटरी क्लब सेंट्रल व इंटरॅक्ट क्लबच्या वतीने सरस्वती हायस्कूलमध्ये ‘लेखक आपल्या भेटीला’ हा उपक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सुरुवातीला मान्यवरांनी रोपाला पाणी घातले. संध्या मांडवकर या विद्यार्थिनीने ‘हीच आमुची प्रार्थना अन्‌ हेच आमुचे मागणे’ ही प्रार्थना सादर केली. मुख्याध्यापक पी.डी. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला संजयसिंह गायकवाड, एम.ई. कांबळे, विमलकुमार बंब, प्रशांत कांबळे, घनश्याम सावलानी, आर.एन. जाधव यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. अनुराधा काळे यांनी सूत्रसंचालन केले. एस.व्ही. पाटील यांनी आभार मानले.

फोटो ओळी

२२०२२०२१-आयसीएच-०३

इचलकरंजीत सरस्वती हायस्कूलमध्ये ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमात लेखक डॉ. महेंद्र कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संजयसिंह गायकवाड, एम.ई. कांबळे, विमलकुमार बंब, प्रशांत कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Students should strive for quality