शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
3
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
4
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
6
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
7
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
8
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
9
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
10
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
11
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
12
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
13
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
14
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
15
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
16
मुंबईत उत्तराखंडमधून आणलेल्या ६.५ कोटींच्या हेरॉईनसह ३ अटकेत, नेमकी कुठे करण्यात आली कारवाई?
17
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
18
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
19
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
20
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी भीतीच्या छायेखाली

By admin | Updated: January 10, 2015 00:36 IST

सूरज पोवार मृत्यू प्रकरण : पोलीस बंदोबस्त; पालकांनी मुलांना घरी बोलावले

कोल्हापूर : पाचगाव (ता. करवीर) येथील राजर्षी छत्रपती शाहू आश्रमशाळेचा विद्यार्थी सूरज शामराव पोवार याच्या मृत्यूनंतर आज, शुक्रवारी या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुले नेण्यास सुरुवात केली. करवीर पोलिसांनी शाळेच्या आवारात पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, याप्रकरणी शाळेतील अधीक्षक, दोन विद्यार्थी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त, मारहाण असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आज या प्रकरणी गांधीनगर पोलिसांकडून कोणास अटक करण्यात आली नसल्याचे सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले.
शिक्षकांनी वारंवार सूरज पोवार याची अवहेलना केली. यामधून सूरजने उचगाव (ता. करवीर) येथे घरामध्ये जाळून घेतले. यामध्ये तो काल, गुरुवारी राजारामपुरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याचा उद्रेक होऊन शाळेतील अधीक्षक संशयित कांतू जाधव (रा. सोलापूर) व इतरांना अटक झाल्याशिवाय शांत बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा पोलिसांसमोर घेतला. त्यानुसार गांधीनगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आज सकाळपासून या शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक पाल्यांना नेण्यासाठी या ठिकाणी येत होते, तर या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. मुख्यालयातील ११ व करवीर पोलीस ठाण्याचे चार असे १५ पोलीस बंदोबस्तासाठी आहेत. या आश्रमशाळेत सुमारे १३० पटसंख्या आहे. यातील सुमारे शंभर मुलांना सूरज पोवार यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर त्यांच्या पालकांनी नेले आहे. त्याचबरोबर शाळाही बंद स्थितीत असून शिक्षकांनी याकडे पाठ फिरविली आहे. (प्रतिनिधी)

सूरजला आश्रमशाळेची श्रद्धांजली
काल, गुरुवारी सकाळी आश्रमशाळा सुरू होती. पहिली ते नववीपर्यंतचे याठिकाणी शिक्षण सुरू आहे.
सूरज हा मृत झाल्याचे समजताच आवारातील फलकावर त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर शाळा सोडण्यात आली.
आज दिवसभर काही मुले शाळा नसल्याने शाळेतील मैदानावर दंग होती,
तर काही मुले भीतीच्या छायेखाली वावरत होती.