शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

हॉट स्पॉट गावांत नियमांची कडक अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:18 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णदर अपेक्षेप्रमाणे कमी होत नसल्याचे दिसत आहे, याची शास्त्रोक्त कारणे शोधून त्यातील त्रुटी दूर करा, ...

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णदर अपेक्षेप्रमाणे कमी होत नसल्याचे दिसत आहे, याची शास्त्रोक्त कारणे शोधून त्यातील त्रुटी दूर करा, हॉट स्पॉट गावांत नियमांची कडक अंमलबजावणी करा, गृह विलगीकरण कमी करा व रुग्णदर नियंत्रणात आणण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण दर, मृत्यू दर, वैद्यकीय उपचार सेवा-सुविधा यांचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असून याची कारणे शोधून त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत. रुग्णसंख्या अधिक असणाऱ्या गावांमधील संसर्ग नियंत्रणासाठी यंत्रणेने अधिक प्रयत्न करावेत. हॉट स्पॉट गावांमध्ये नियमांची कडक अंमलबजावणी करा. गृह विलगीकरण प्रभावीपणे होतेय का, यावर लक्ष ठेवा. गृह विलगीकरणातील रुग्ण, बाधित तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या, उपलब्ध खाटा ही माहिती ऑनलाईन पद्धतीने अद्ययावत करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

प्रभारी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

----

फोटो नं ०९०७२०२१-कोल-कोरोना बैठक

ओळ :

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

---