शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ताणतणाव,भविष्याबद्दलचा अंधार हीच आत्महत्येची कारणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 12:35 IST

Suicide Kolahpur : रोगाबद्दलचे भय, आर्थिक ताणतणाव व भविष्याबद्दलची चिंता ही मुख्यत: आत्महत्या करण्यामागील महत्त्वाची कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी गडमुडशिंगी येथे महिलेने मुलीसह, तर शुक्रवारी पन्हाळा तालुक्यातील कळेजवळील गोठे येथील दांपत्याने मुलासह नदीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनांनी समाजमन हादरले. मुलांसह आत्महत्या करण्याचे प्रमाण समाजात वाढले आहे. त्याच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न लोकमतने केला.

ठळक मुद्देताणतणाव व भविष्याबद्दलचा अंधार हीच आत्महत्येची कारणे भावनिक विश्व समृद्ध करणे हाच उपाय

विश्र्वास पाटीलकोल्हापूर : रोगाबद्दलचे भय, आर्थिक ताणतणाव व भविष्याबद्दलची चिंता ही मुख्यत: आत्महत्या करण्यामागील महत्त्वाची कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी गडमुडशिंगी येथे महिलेने मुलीसह, तर शुक्रवारी पन्हाळा तालुक्यातील कळेजवळील गोठे येथील दांपत्याने मुलासह नदीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनांनी समाजमन हादरले. मुलांसह आत्महत्या करण्याचे प्रमाण समाजात वाढले आहे. त्याच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न लोकमतने केला.ज्येष्ठ समाज संवादक इंद्रजित देशमुख म्हणाले, लोकांचे भावनिक विश्व संपत येणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. त्यावर जगभर संशोधन सुरू आहे. समाजातील तणावग्रस्तता विविध कारणांनी वाढली आहे आणि त्याचवेळेला आजूबाजूचे हक्काचे आधार खोकले झाले आहेत. त्यामुळे लोक मरणाला जवळ करत आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीत असुरक्षितता नव्हती. आता ढीगभर नातलग असूनही कुणाचा आधार वाटत नाही. बाईला बाप असतो तोपर्यंत माहेर हक्काचे असते. भावाच्या राज्यात ते उपकाराचे होते. त्यामुळे स्वाभिमानी बाई कधीच वडील गेल्यानंतर माहेरकडे हात पसरायला जात नाही. अशा अनेक कारणांनी एकाकीपण वाढत आहे. त्यामुळे संकटाला सामोरे जाण्याऐवजी लोक मृत्यूला जवळ करत आहेत ते फारच हादरवून सोडणारे आहे.मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कावेरी चौगले म्हणाल्या, कोविडमुळे संपलेला रोजगार, त्यातून आलेली आर्थिक अस्वस्थता, यातून आपल्या जीवनात भविष्यात काही चांगले घडेल असा आशावाद संपुष्टात येणे या सगळ्याचा परिणाम म्हणून सामूहिक आत्महत्या होत आहेत. या आत्महत्यांची कारणे सामाजिकच आहेत. ताण एकट्यापुरताच मर्यादित असतो तेव्हा व्यक्ती आपले जीवन संपवते; परंतु आपण भविष्यात कुटुंबाचा सांभाळ चांगल्या पद्धतीने करू शकतो हा विश्वास संपून जातो तेव्हा कुटुंबासह आत्महत्या करण्याची प्रवृत्ती बळावते. अशा पद्धतीने आत्महत्या करण्याचा निर्णयही कुटुंबप्रमुख म्हणून पुरुषाचाच असतो.कशा रोखता येतील या घटना..१.आर्थिक अडचण, कौटुंबिक मालमत्तेतील वादात झालेली फसवणूक, वेगवेगळ्या कारणांनी समाजात, कुटुंबात होणारी मानहानी अशी वरकरणी न दिसणारी अनेक कारणे या घटनांच्या तळाशी असतात. त्यांचा वेळीच शोध घेऊन संबंधित व्यक्तीचा ताण कमी केल्यास, त्याला आधार दिल्यास अशा घटना रोखता येतील.२.एखादी व्यक्ती आत्ममग्न बनली आहे. समाजापासून तुटली आहे. जगण्यात रस नाही असे वर्तन करते तेव्हा वेळीच सावध होऊन तिच्याशी सतत बोलत राहिले पाहिजे, सकारात्मक ऊर्जा पेरत राहिले पाहिजे.३.आत्महत्येचा विचार मनात आला की, लगेच तो आत्महत्या करत नाही. अनेक दिवस त्याच्या मनाच्या तळाशी तो विचार मुळे धरत असतो. त्या काळात त्याच्या वर्तणुकीतील नैराश्य हेरून मानसिक आधार देण्याचा प्रयत्न पत्नी, आईवडील, मुलांकडून झाला पाहिजे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर