शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रॉबेरीवर ‘अवकळा’

By admin | Updated: November 15, 2014 00:05 IST

पावसाने पळापळ : शेतकरी हवालदिल

सातारा : अवकाळी पावसाच्या हजेरीचा मोठा फटका स्ट्रॉबेरीच्या पिकांवर पडला आहे. भविष्यातही अशीच परिस्थिती राहिली तर येणाऱ्या हंगामात स्ट्रॉबेरी चढ्या दराने बाजारात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अचानक पडणाऱ्या या पावसामुळे आरोग्यावरही परिणाम होत आहे. दरम्यान, ऐन नोव्हेंबरात अचानक पडलेल्या पावसामुळे सातारा शहरातही नागरिकांची पळापळ उडाली.महाबळेश्वर, पाचगणीसह जावळी खोऱ्यात स्ट्रॉबेरीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. स्ट्रॉबेरी हिवाळ्यात येणारे फळ आहे. आॅक्टोबरनंतर या रोपांना स्ट्रॉबेरीची फळे लागतात. आता शेतात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचे फळ दिसू लागले होते. यंदा थंडीचा मोसम व्यवस्थित आल्याने स्ट्रॉबेरीचे उत्पन्न चांगले राहणार, असा शेतकऱ्यांचा कयास होता. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाच्या शिडकाव्याने शेतकरी धास्तावला होता. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरीचे फळ शेतातच खराब होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. पावसाची रिमझिम आणि ढगाळ वातावरणही स्ट्रॉबेरीसाठी घातक असते. स्ट्रॉबेरीत अ, ब, क ही जीवनसत्त्व आढळतात. त्यात १०.५ टक्के ग्लुकोजचे प्रमाण असते. अल्प अ‍ॅसिडिक लेवल असलेल्या या फळात सुमारे २०० बिया असतात. शरीरातील विषारी द्रव्य नष्ट करण्यासाठी या बिया उपयुक्त असतात. गुलाब वर्गीय असलेले हे एकमेव थंडीत येणारे फळ आहे. मोठी मागणी असताना आणि दरही चांगला असताना निसर्गाच्या अवकृपेमुळे स्ट्रॉबेरी उत्पादक अडचणीत आला आहे.द्राक्ष उत्पादक अडचणीतसातारा तालुक्यासह कोरेगाव, वाई, भुर्इंज, मायणी या परिसरातही पावसाने हजेरी लावली. मायणी भागात अनेक ठिकाणी द्राक्ष बागांचेही या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्ष उत्पादकांचे यामुळे मोठे नुकसान होणार आहे. दरम्यान, सातारा शहरात सकाळपासून कधी भुरभूर तर कधी सरी येत असल्याने नागरिकांना स्वेटरबरोबरच रेनकोट घेऊन बाहेर पडावे लागले.