शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

गगनबावड्यात तुफान पाऊस, धबधबे लागले वाहू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:27 IST

गगनबावडा- गगनबावडा परिसर आणि करूळ घाटात गुरुवारी सायंकाळी चारपासून सुमारे दोन तास तुफान पावसाने झोडपून काढले. धुक्यात करूळ घाट ...

गगनबावडा- गगनबावडा परिसर आणि करूळ घाटात गुरुवारी सायंकाळी चारपासून सुमारे दोन तास तुफान पावसाने झोडपून काढले. धुक्यात करूळ घाट हरवल्याने आणि खराब रस्त्यांमुळे वाहनचालकांची दमछाक होत होती. वैभववाडी ते गगनबावडा या पट्ट्यात काल सायंकाळी चार वाजता पाऊस उतरून काळोख पडला होता. पावसाला तुफान सुरुवात झाली होती. करूळ घाटातून धुके पसरल्याने आणि तुफान पाऊस असल्याने पुढचा रस्ताच दिसत नव्हता. अवजड वाहनांची रांगच लागली होती. गगनगिरी पर्वतावर प्रचंड पावसाने घाटातील आठा-दहा धबधबे जोरदार वाहत होते. अनेक ठिकाणी घाटात रस्ते उखडलेले असल्याने आणि त्यावरून वाहणाऱ्या पाण्याने वाहने चालविणे अवघड होत होते. अवजड वाहने एकामागोमाग लागल्याने कोकणात जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्यांना मार्ग काढणे कठीण होत होते. करूळ घाटात यापूर्वी झालेल्या प्रचंड पावसाने अनेक ठिकाणी छोट्या-छोटया दरडी कोसळून मोहरीमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन ते उखडून गेले आहेत. अनेक ठिकाणी दोन-दोन फुटांचे खड्डे पडले आहेत. बहुतेक सर्व अवघड वळणावरील रस्ते पूर्णतः उखडल्याने अवजड वाहनांना पुढे सरकताच येत नाही. अनेक ठिकाणचे रस्ते पाण्यामुळे उखडले आहेत. करूळ घाटच उद्ध्वस्त झाला आहे. गगनबावड्याच्या सीमेवर कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करतानाचा रस्ता चांगला आहे; पण बावडा ते साळवण मार्गावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने रस्ता खड्डेमय झाला आहे. काही ठिकाणी खड्डे खोल असल्याने वाहने चालविणे कठीण होते. जेथे-जेथे रस्त्याकडेचे पाणी रस्त्यावर आले आहे, तेथे चाळण झाली आहे. रस्त्यावर येणारे पाणी अडविणे किंवा त्याला मार्ग काढून न दिल्याने गेल्या उन्हाळ्यात केलेला रस्ता अनेक ठिकाणी उद्ध्वस्त झाला आहे. काही ठिकाणी खड्ड्यांची छोटी तळीच झाली आहेत. कोकणात आणि गोव्याकडे रात्रीच्यावेळी जाणारी अवजड वाहने तसेच खासगी आराम गाड्यांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.