शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सोमय्या यांना रोखण्यासाठी पोलिसांनी केले टप्पे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:27 IST

कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कोल्हापुरात प्रवेश होऊ नये, यासाठी कोल्हापूर पोलीस दलाने विविध टप्प्यांवर नियोजनबध्द आखणी ...

कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कोल्हापुरात प्रवेश होऊ नये, यासाठी कोल्हापूर पोलीस दलाने विविध टप्प्यांवर नियोजनबध्द आखणी केली. प्रत्येक टप्प्यावर अप्पर पोलीस अधीक्षकांकडे जबाबदारी दिली; पण सातारा ते कऱ्हाड या सुमारे पाऊणतासाच्या रेल्वे प्रवासात अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी सोमय्या यांचे मनपरिवर्तन केले. त्यामुळे ते कोल्हापुरात न येता कऱ्हाडमध्येच उतरले.

सोमय्या रेल्वेत बसल्यानंतर त्यांना मिरज अथवा जयसिंगपूर रेल्वेस्थानकावर ताब्यात घेणार, असेच सर्वांना गाफील ठेवून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांना सातारा येथे पाठवले. तेथून पुढे कऱ्हाडपर्यंतच्या पाऊण तासाच्या रेल्वेप्रवासात काकडे यांनी सोमय्या यांना जिल्हाप्रवेश बंदी आदेश, कायदा व सुव्यवस्थेला बाधा येण्याची स्थिती समजावून सांगितली. ती मान्य केल्याने ते कऱ्हाड येथेच उतरले. कऱ्हाडहून पुढे आले असते, तर जयसिंगपूरमध्ये त्यांची समजूत काढण्याची जबाबदारी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्यावर सोपवली होती. पण ती वेळच आली नाही. अन् पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नि:श्वास सोडला.

दोन बंदी आदेश, पोलीस बंदोबस्त

जिल्ह्यात प्रवेश करण्यास सोमय्या यांना बंदी आदेश काढला, तसा जिल्ह्यात कार्यकर्ते एकत्र जमू नये, वाद करू नये यासाठी कलम १४४ अंतर्गत जमावबंदीचे आदेश काढून कार्यकर्त्यांनाही नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती चिघळू नये म्हणून कागल येथे ७०० हून अधिक, मुरगूड येथेही ५०० हून अधिक, तर गडहिंग्लज, जयसिंगपूर, किणी टोल नाका, इचलकरंजीसह कोल्हापूर शहरातही पोलीस फौजफाटा तैनात होता. त्यामुळे रेल्वेने अगर मोटारीनेही सोमय्या कोल्हापुरात येऊ नये, याचे नियोजन केले होते.