शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
5
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
6
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
9
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
10
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
11
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
12
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
13
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
14
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
15
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
16
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
17
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
18
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
19
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
20
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्या महाडिकांचा हे राजकीय भांडवल : महाडिक

By admin | Updated: January 10, 2015 00:50 IST

मी पशुप्रेमी असून माझ्याकडे सहा घोडी, दहा कुत्री, गायी, म्हशी, बैल अशी जनावरे आहेत. त्यामुळे बिबट्याला कोणतीही दुखापत होऊ न होता पकडावे, अशी सूचना आपण वनविभाग व जिल्हा प्रशासनासही दिली होती.

कोल्हापूर : भरवस्तीत आलेला बिबट्या हा जणू धनंजय महाडिक यांनीच पाळला असल्याची चर्चा करून या प्रकरणाचे काही लोकांकडून मुद्दाम राजकीय भांडवल केले जात असल्याची टीका खासदार धनंजय महाडिक यांनी आज, शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केली. बिबट्या आमचा होता असे म्हणणे हा निव्वळ बालिशपणा आहे, अशीही टिप्पण्णी त्यांनी केली.
महाडिक म्हणाले, ‘आपण ३१ डिसेंबरला पार्टीसाठी त्याला आणले होते, असा प्रचार केला जात आहे. काही लोक याचे राजकीय भांडवल करीत आहेत. मी पशुप्रेमी असून माझ्याकडे सहा घोडी, दहा कुत्री, गायी, म्हशी, बैल अशी जनावरे आहेत. त्यामुळे बिबट्याला कोणतीही दुखापत होऊ न होता पकडावे, अशी सूचना आपण वनविभाग व जिल्हा प्रशासनासही दिली होती. त्याच्या अंगावर कोणतीही जखम नव्हती. तरीही याबाबत उलटसुलट चर्चा केली जात आहे. आपण आयुष्यात साधी मुंगीही मारलेली नाही. त्यामुळे आपल्याबाबत वर्तमानपत्रांसह इतरत्र सुरू असलेली चर्चा अर्थहीन आहे. त्या दिवशी सकाळी बिथरलेला बिबट्या कंपाउंडवरून उडी मारून शेजारील देशपांडे यांच्या घरात घुसला. वनविभाग, पोलीस, अग्निशमन दलाला तत्काळ कळविले. हे सर्व लोक आले; परंतु यांच्याकडे या बिबट्याला पकडण्यासाठी कोणतेही साधन नव्हते; त्यामुळे आपण माकडवाला वसाहत येथील मुलांना जाळे घेऊन येण्यास सांगितले. या सुंदर जनावराला साधी काठीसुद्धा मारू नका, असे सांगितले होते. (प्रतिनिधी)


स्वसंरक्षणार्थ रिव्हॉल्व्हर हातात घेतले
जर तुम्ही पशुप्रेमी आहात, तर त्या दिवशी तुम्ही रिव्हॉल्व्हर का हातात घेतले? अशी विचारणा पत्रकारांनी केल्यावर महाडिक म्हणाले, बिबट्याने एकदा जर एखाद्याला पकडले तर तो सहजासहजी सोडत नाही. आपले कुटुंबीय या ठिकाणी होते. त्यामुळे तसा काही बाका प्रसंग आल्यास स्वसंरक्षणासाठी आपण रिव्हॉल्व्हर हाती घेतले होते.