शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
2
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
3
Marathi News LIVE: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
4
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
5
Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
6
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
7
इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
8
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
9
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
10
दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले
11
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
12
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
13
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
14
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
15
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
16
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
17
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
18
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
19
Trisha Krishnan: तृषा कृष्णनने लग्न का केलं नाही? बिजनेसमॅनसोबत झालेला साखरपुडा, लग्नही ठरलेलं, पण...
20
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
Daily Top 2Weekly Top 5

भीमा कृषी प्रदर्शनाला आजपासून प्रारंभ

By admin | Updated: January 29, 2015 23:54 IST

चारशे स्टॉल्स्ची उभारणी : पशुपक्षी प्रदर्शन, व्याख्याने, पुरस्कार, आदी कार्यक्रम

कोल्हापूर : ‘पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन’ म्हणून भीमा कृषी प्रदर्शन ओळखले जाते. यंदा हे प्रदर्शन उद्या (दि. ३० ते २ फेबु्रवारीअखेर) मेरी वेदर मैदान येथे आयोजित केले आहे. दरवर्षीप्रमाणेच विविध पशू आणि पक्ष्यांचे प्रदर्शन, मत्स्य व अश्व प्रदर्शन, तांदूळ महोत्सव हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या, शुक्रवारी दुपारी तीन वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी आमदार महादेवराव महाडिक आहेत.
यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी राजाराम माने, ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील, केडीसीसी बँक प्रशासक प्रतापसिंह चव्हाण, जिल्हा कृषी अधीक्षक मोहन आटोळे, बसवराज मास्तोळी, रिलायन्स पॉलिमर्सचे सत्यजित भोसले, महालक्ष्मी इंडस्ट्रीजचे प्रशांत पारडे, महालक्ष्मी इस्पातचे जितूभाई गांधी, आदी उपस्थित राहणार आहेत.यावेळी शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी महिला, संशोधक, तंत्रज्ञांना विविध पुरस्कार दिले जाणार आहेत, तर शेतीसाठी जीवन समर्पित केलेल्या व्यक्तीला भीमा कृषी जीवनगौरव पुरस्कार देणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
या प्रदर्शनात देश-परदेशांतील कृषीविषयक कंपन्या, नवतंत्रज्ञान, शेती उत्पादने, शेतीसाठी उपयुक्त चर्चासत्रे आणि परिसंवाद आयोजित केली जाणार आहेत. याशिवाय एक हजार वैशिष्ट्यपूर्ण जनावरे (गाय, म्हैस, बैल, वराह, कोंबडी, इमू) यांचा समावेश करण्यात आला आहे. पक्षी प्रदर्शन, फ्लॉवर शो, मत्स्य प्रदर्शन व अश्व प्रदर्शन ही वैशिष्ट्ये ठरणार आहेत. प्रदर्शनात ४०० स्टॉल उभारण्यात आले असून यातील २०० स्टॉल महिला बचत गटांना देण्यात येणार आहेत. प्रदर्शनाच्या चार दिवसांत सांस्कृतिक कार्यक्रम, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्र होणार आहेत.