शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंका, नेपाळ करणार कोल्हापूरच्या सहकारी चळवळीचा अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:56 IST

भारताच्या शेजारी राष्ट्रांसमवेत सकारात्मक सहकार्य संबंध वृद्धिंगत व्हावेत, यासाठी केंद्रीय कृषी विभाग, पुणे येथील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन ...

भारताच्या शेजारी राष्ट्रांसमवेत सकारात्मक सहकार्य संबंध वृद्धिंगत व्हावेत, यासाठी केंद्रीय कृषी विभाग, पुणे येथील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था (वाम्निकॉम), सेंटर फॉर इंटरनॅशनल ट्रेनिंग इन ॲग्रिकल्चर बँकिंग (सिक्टॅब) संस्था आणि शिवाजी विद्यापीठातील यशवंतराव चव्हाण स्कूल फॉर रुरल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने एक्स्पोजर व्हिजिट प्रोग्राम ऑन को-ऑपरेटिव्ह बिझनेस मॉडेल हा उपक्रम शुक्रवार (दि.५) पर्यंत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ ऑनलाईन, ऑफलाईन पध्दतीने विद्यापीठात झाला. अर्थशास्त्र अधिविभागाच्या सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, तर ‘वाम्निकॉम’चे संचालक डॉ. के. के. त्रिपाठी प्रमुख उपस्थित होते. कोल्हापूर हे भारताच्या सहकारी चळवळीचे महत्त्वाचे केंद्र आहे. येथील सहकारी चळवळीच्या गुणवैशिष्ट्यांचा आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी अभ्यास करावा, असे आवाहन डॉ. त्रिपाठी यांनी केले. आर्थिक लाभापेक्षाही सहकारी चळवळीमुळे झालेले शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, महिलांचे सबलीकरण, आदी सामाजिक लाभ हे दूरगामी महत्त्वाचे आहेत. त्यांचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे डॉ. शिर्के यांनी सांगितले. सिक्टॅबचे सल्लागार डॉ. डी. रवी, वाम्निकॉमचे डॉ. यशवंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, ए. एम. गुरव यांच्यासह नेपाळमधील तीन, तर पुणे, नागपूर, बंगलोर, त्रिवेंद्रम येथील १५ अभ्यासक उपस्थित होते. चेतन गळगे यांनी स्वागत केले. वैशाली भोसले यांनी प्रास्ताविक केले. संतोष सुतार यांनी आभार मानले. दरम्यान, चित्रा थम्सुहांग (नेपाळ), असंका थिलंगरत्ने, गणेश भाड, जयमोहन नायर, कल्पिता सरकार (श्रीलंका), मोहम्मद मुर्शदुल इस्लाम (बांगलादेश) हे ऑनलाईन सहभागी झाले.

चौकट

विविध बाजूंचा परिचय

या उपक्रमांतील सहभागी अभ्यासक, प्रतिनिधींना कोल्हापूरमधील सहकार चळवळीच्या विविध बाजूंचा परिचय करून दिला जाणार आहे. त्यांनी सहकार विषयक हे उपक्रम आपआपल्या देशात जाऊन राबवावेत. तेथील सर्वसामान्य नागरिकांचा सहकाराच्या बळावर विकास करावा, असा ‘एक्स्पोजर व्हिजिट प्रोग्राम’ चा उद्देश आहे.

फोटो (०२०२२०२१-कोल-एक्सपोझर व्हिजीट प्रोग्राम (एसयुके) : शिवाजी विद्यापीठात मंगळवारी आंतरराष्ट्रीय ‘एक्स्पोजर व्हिजिट प्रोग्राम’ या उपक्रमाची सुरुवात झाली. त्याच्या उद‌्घाटनप्रसंगी नेपाळ, श्रीलंका, बांगलादेशातील अभ्यासक, प्रतिनिधी उपस्थित होते.