कोडोली येथील यशवंत धर्मार्थ रुग्णालयास विशेष पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:44 IST2021-02-06T04:44:16+5:302021-02-06T04:44:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोडोली : कोडोली, ता. पन्हाळा येथील यशवंत ...

Special Award to Yashwant Charitable Hospital at Kodoli | कोडोली येथील यशवंत धर्मार्थ रुग्णालयास विशेष पुरस्कार

कोडोली येथील यशवंत धर्मार्थ रुग्णालयास विशेष पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

कोडोली : कोडोली, ता. पन्हाळा येथील यशवंत धर्मार्थ रुग्णालयास महात्मा फुले व प्रधानमंत्री आरोग्य योजनेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य हमी सोसायटीतर्फे विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मिलिंद गोडबोले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना २०१६ पासून सुरू करण्यात आली आहे. रुग्णालयाने केलेल्या कामाचा आढावा घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या योजनेंतर्गत ३०६६ रुग्णांना लाभ मिळाला. यामध्ये जनरल सर्जरी, मेडिसिन विभाग, स्त्रीरोग प्रसूती, कॅन्सर शस्त्रक्रिया, नवजात शिशू व लहान मुलांवरील उपचार, किडनी विकार डायलेसीस व मूत्ररोग यासारख्या आजारांचा समावेश आहे. पुरस्कार प्रदान करतेवेळी योजनेचे क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ. कुंडलकर, जिल्हा समन्वयक डॉ. सुभाष नांगरे, डॉ. श्रीनिवास अपशिंगे, टीपीए कंपनीचे राहुल तवार, डॉ. चेतन खाडे उपस्थित होते. संस्थेचे सचिव डॉ. जयंत पाटील, विश्वस्त सौ. विनिता पाटील, अधीक्षक डॉ. मिलिंद गोडबोले, डॉ. अभिजीत इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो ओळ

कोडोली येथील यशवंत धर्मार्थ रुग्णालयास महात्मा फुले व प्रधानमंत्री आरोग्य योजनेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करताना जिल्हाधिकारी दौलतराव देसाई, डॉ. मिलिंद गोडबोले यांच्यासह आदी मान्यवर.

Web Title: Special Award to Yashwant Charitable Hospital at Kodoli