शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

नियोजित जागेचा फलक लावून खंडपीठ आंदोलनाचे रणाशिंग फुंकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 16:25 IST

शेंडा पार्क येथील खंडपीठाच्या नियोजित जागेवर ‘खंडपीठासाठीची जागा’ असा फलक लावून आंदोलनाचे रणशिंग पुन्हा जोमाने फुंकण्याचा निर्धार शुक्रवारी खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. यावेळी कायमस्वरूपी स्वतंत्र समिती नेमण्याचा निर्णय झाला.

ठळक मुद्देनियोजित जागेचा फलक लावून खंडपीठ आंदोलनाचे रणाशिंग फुंकणारखंडपीठ कृती समितीच्या बैठकीत निर्णय, कायमस्वरूपी समिती नियुक्ती करणार

कोल्हापुर : शेंडा पार्क येथील खंडपीठाच्या नियोजित जागेवर ‘खंडपीठासाठीची जागा’ असा फलक लावून आंदोलनाचे रणशिंग पुन्हा जोमाने फुंकण्याचा निर्धार शुक्रवारी खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. यावेळी कायमस्वरूपी स्वतंत्र समिती नेमण्याचा निर्णय झाला.

एकदा आंदोलन सुरू केल्यानंतर निर्णय होईपर्यंत थांबू नये, अशा सूचनाही सर्व वकिलांनी केल्या. कोल्हापुरात खंडपीठाचे सर्किट बेंच होण्यासाठीच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी कसबा बावडा येथील जिल्हा न्यायालयातील हॉलमध्ये बैठक झाली. अध्यक्षस्थानी खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक रणजित गावडे होते.महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलचे सदस्य अ‍ॅड. विवेक घाटगे म्हणाले, चर्चा, आंदोलन आणि कायदेशीर लढाई अशा तीन प्रकारे आंदोलन सुरू आहे. आता संयम संपत असून कायदेशीर मार्गाने तीव्र लढाई करण्याची वेळ आली आहे.कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय यावर निर्णय होणार नाही. त्यामुळे पुढील टप्प्यात आंदोलन तीव्र करावे लागेल. मोहन जाधव, जारीक अत्तार यांनी एकदा सुरू केलेले आंदोलन निर्णय होईपर्यंत मागे घेऊ नये. आंदोलनावेळी सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, ‘रास्ता रोको, रेल रोको,’ अशी आंदोलन करण्याची सूचना मांडली.

महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल विवेक घाटगे, संग्राम देसाई, वसंत भोसले यांचा सत्कार करण्यात आला. भोसले, देसाई यांनीही भूमिका मांडली. अ‍ॅड. राजेंद्र रावराणे, विश्वास चिडमुंगे, दिलीप पोतदार, शिवाजीराव राणे, दिनेश कोठावळे, अजित मोहिते, अमरसिंह भोसले, प्रकाश मोरे, आदींनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष अ‍ॅड. जे. व्ही. पाटील, सेक्रेटरी गुरुप्रसाद माळकर, अतुल जाधव, शिल्पा सुतार, सपना हराळे, वैभव काळे, रमेश पोवार उपस्थित होते.शेंडा पार्कची जागा खंडपीठासाठीचशेंडा पार्क येथील २४ एकर जागा खंडपीठासाठी आरक्षित आहे. सहा जिल्ह्यांतील सर्व तालुका बार असोसिएशनच्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी वृक्षारोपण करून परिसरात खंडपीठाची नियोजित जागा असल्याचे फलक लावून नव्याने आंदोलनाचे रणशिंगे फुंकू, असे कृती समितीचे निमंत्रक रणजित गावडे यांनी सांगितले.मशाल परत पेटवावी लागेलसातारा येथील दिलीप पाटील यांनी आंदोलनाचा उत्साह कमी झाला असल्याबाबत खेद व्यक्त केला. जोश संपला असून नव्या जोमाने आंदोलन सुरू करावे. आंदोलनाची मशाल परत पेटवावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. विरोधक उभे राहणार नाहीत, असे तीक्ष्ण हत्यार वापरण्याची वेळ आल्याचेही त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर