शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरदऱ्यात घुमला गाड्यांचा आवाज ! मान्सून मॅडनेस रॅली

By admin | Updated: August 17, 2014 22:32 IST

राज्यातून दीड हजार स्पर्धकांचा सहभाग

सातारा : रिमझिम पावसाची मजा, दाट धुके, खाचखळग्यांचे डोंगरदऱ्यातील रस्ते, वेडीवाकडी वळणे असलेले घाट अन् भोवताली हिरवा निसर्ग अशा १८० किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर रम्य वातावरणात दुचाकी आणि चारचाकीस्वारांनी मान्सून मॅडनेस रॅलीचा थरार अनुभवला. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता शिवतीर्थावरील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून रॅलीस सुरुवात झाली. या रॅलीचा शुभारंभ झेंडा दाखवून खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. यावेळी संकेत शानभाग, ज्येष्ठ क्रीडामार्गदर्शक रमेश शानभाग, सुधाकर शानभाग, शिरीश चिटणीस, रमेश हलगेकर, अ‍ॅड. दत्ता बनकर, मकानदार मिस्त्री, राहुल घायताडे, निशांत गवळी, बाळासाहेब ठक्कर, किरण गेंगजे, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, शैलेश बिडवाई, पप्पू जाधव, संतोष सानप, अ‍ॅड. कमलेश पिसाळ, डॉ. पल्लवी पिसाळ, दीपक पाटील, हाफीज शेख, समीर मकानदार आदी उपस्थित होते. यंदा रॅलीसाठी नवीन मार्ग ठेवण्यात आला होता. ही रॅली सातारा- पोवई नाका येथून सुरु होऊन राजपथावरुन मोतीचौक मार्गे राजवाडा, बोगदा, शेंद्रे, वळसे, नागठाणे मार्गे-उंब्रज, पाटण, पाचगणी जंगल, परत पाटण, उंब्रज व पुन्हा परत सातारा असा एकूण अंदाजे १८० किलोमीटरचा प्रवास दुचाकी व चारचाकीस्वारांनी पूर्ण केला. खासदार उदयनराजेंनीही या रॅलीत चारचाकी जीप चालवत सहभागी झाल्याने शेकडो स्पर्धकांचा उत्साह द्विगुणीत झाला. हिरवाईने नटलेला भोवताल, पवनऊर्जा प्रकल्पाचा अनोखा देखावा, कोकण पर्यटनाचा आस्वाद देणारा सातारा जिल्ह्याचा पश्चिम घाट परिसर, जंगल, डोंगरकपारीतून वाऱ्याच्या झोतामुळे पुन्हा आकाशात उलटे उडणारे छोटे झरे, धबधब्यांची विहंगम दृश्ये असे अनुपम निसर्गसौंदर्य डोळ्यांत साठवत स्पर्धकांनी रॅलीचा आनंद घेतला. रॅलीत कोणतीही आपत्कालीन घटना घडू नये यासाठी रेस्क्यू सेवा पथक तसेच रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली होती. शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी वाहतूक पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी) पश्मिच बंगाल, गोवा, दिल्लीचेही स्पर्धक तब्बल १३०० हून अधिक जण या मान्सून मॅडनेस रॅलीत सहभागी झाले होते. साताऱ्यासह पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सांगली, कराड, गोवा, अहमदनगर, तसेच परराज्यातून दिल्ली, पश्चिम बंगाल येथीलही उत्साही स्पर्धक सहभागी झाले होते.