शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस मोजण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राधानगरी : विविध कारणांसाठी अत्यावश्यक असलेल्या पावसाची मोजणी करण्याची पारंपरिक पद्धत आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

राधानगरी : विविध कारणांसाठी अत्यावश्यक असलेल्या पावसाची मोजणी करण्याची पारंपरिक पद्धत आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. शासनाने पावसाबरोबर आर्द्रता, तापमान, वा-याचा वेग व दिशा याच्या दर दहा मिनिटाला अचूक माहिती देणारा अत्याधुनिक व स्वयंचलित महावेद हा प्रकल्प सुरू केला आहे. राज्यातील महसूल मंडलनिहाय 2105 ठिकाणी अशी स्वयंचलित हवामान केंद्रे सुरू केली आहेत.

2017 मध्ये याची प्रयोगिक तत्त्वावर सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून तो सुरू आहे. तरीही गेल्यावर्षीपर्यंत दोन्ही प्रकारे माहिती संकलित केली जात होती. मात्र यावर्षी जुन्या प्रकारे होणारे संकलन बंद करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व स्कायमॅट वेदर सर्विसेस या खासगी कंपनीच्या सहभागातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

पाच मिटर बाय सात मिटर एवढ्या मोकळ्या जमिनीत याची उभारणी केली आहे. मध्ये एक खांब आहे. त्यावर याचे पाच पॅरामिटर आहेत. त्यातून पाऊस, आर्द्रता, तापमान, वा-याचा वेग व दिशा याची सेन्सरद्वारे नोंद होते. याला सोलर पॅनल व चार्ज होणारी बॅटरी आहे. सूर्यप्रकाश नसला तरी दहा ते पंधरा दिवस चालेल एवढी क्षमता बॅटरीची आहे. यात संकलित होणारी ही सर्व माहिती दर दहा मिनिटाला कृषी आयुक्तालय पुणे येथील मुख्य सर्वरला नोंद होते. जिल्हा पातळीवर कृषी अधीक्षक अधिकारी यांनाच ती पाहता येते.

या स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे संकलित झालेल्या माहितीच्या आधारेच हवामान आधारित पंतप्रधान पीक विमा योजनेतील नुकसान भरपाई दिली जाते. कोल्हापूर जिल्ह्यात 76 ठिकाणी अशी केंद्रे सुरू केली आहेत. काही महसूल मंडल मुख्यालयाच्या ठिकाणी जागा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी लगतच्या गावात त्याची उभारणी केली आहे. त्याची देखभाल करण्यासाठी स्कायमॅट वेदर सर्विसेस या कंपनीची नेमणूक केली आहे.

फोटो ओळ- महाराष्ट्र शासन कृषी विभाग व स्कायमॅट वेदर सर्विसेस यांच्या सहभागातून प्रत्येक महसूल मंडळाच्या ठिकाणी अशा प्रकारची स्वयंचलित हवामान केंद्रे सुरू केली आहेत.