शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

समाजात अजूनही माणुसकी टिकून

By admin | Updated: June 11, 2015 00:12 IST

अमित सैनी : अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे महेशचा सत्कार

कोल्हापूर : अपंगांना समस्या भरपूर असतात. मात्र, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन करणारे लोक समाजात मोजकेच असतात. त्यांपैकी ‘अखिल भारतीय मराठा संघ’ हा एक आहे. नि:स्वार्थीपणे काम करणाऱ्या अशा महासंघामुळे समाजात अजूनही माणुसकी टिकून आहे. ‘महेश’सारख्या जिद्दी युवकाचा योग्य सत्कार करून त्याला त्यांनी नवे पंख दिले आहेत. सामाजिक बांधीलकी जपत प्रशासनाच्यावतीनेही महेशला जी काही मदत करता येईल, ती सर्वतोपरी केली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिली. शाहू स्मारक भवन येथे अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेक सोहळ्यातील खर्चाला फाटा देत सामाजिक बांधीलकी जपत अपघातामध्ये दोन्ही हात व पाय गमाविलेल्या महेश याच्या नावे बुधवारी ११ हजार रुपयांची ठेव पावती ठेवण्यात आली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.सैनी म्हणाले, महेशने अपंगत्वामुळे स्वत:चे खच्चीकरण करून न घेता, अपंगत्व विसरून दुसऱ्यांना शिकविण्याचे काम केले आहे. त्याचे काम खरेच कौतुकास्पद आहे. महेशने उच्च शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत रुजू व्हावे, अशी मी त्याला शुभेच्छा देतो. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. शर्मा म्हणाले, विधायक कामे करणारे कमी आणि प्रसिद्धी मिळविणारे अनेकजण असतात. मात्र, मराठा महासंघाने सर्व समाजाला एकत्र आणत हे विधायक काम केले आहे. जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, श्रीनिवास गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शशिकांत पाटील यांनी स्वागत केले; तर शामराव पाटील यांनी आभार मानले. यावेळी कादर मलबारी, भाऊसाहेब काळे, शंकरराव शेळके, चंद्रकांत चव्हाण, प्रकाश पाटील, आप्पा मिसाळ, डॉ. शिवाजीराव हिलगे, अवधूत पाटील, शैलजा भोसले, प्रताप साळोखे, डॉ. डी. बी. चौगुले, महादेव पाटील, किशोर घाटगे, उषा लांडे, प्रकाश नलवडे, शामराव पाटील, राजू फरांडेकर, आदी उपस्थित होते. पंधरा मुलांची शिकवणी...वयाच्या चौदाव्या वर्षी घरावरील पतंग काढताना विजेचा धक्का बसून महेशला दोन्ही हात-पाय गमवावे लागले. यावर ना उमेद न होता महेशने बी. ए. (इंग्रजी) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. महेश आपल्या घरामध्ये इंग्रजी शिकवणी घेऊन मुलांना मार्गदर्शन करीत आहे. सध्या तो पंधरा मुलांना इंग्रजी शिक विण्याचे काम करीत आहे.