शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी पालिकेच्या दारात सामाजिक कार्यकर्त्याचा पेटवून घेतल्याने मृत्यू    

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 02:41 IST

Ichalkaranji News : सामाजिक कार्यकर्ते नरेश सीताराम भोरे (वय ४८, रा. सोलगे मळा, शहापूर) यांनी सोमवारी नगरपालिकेच्या पार्किंग प्रवेशद्वारात पेटवून घेतले. त्यात ते गंभीर जखमी झाले होते.

इचलकरंजी- घंटागाडीचालकाकडून झालेल्या अर्वाच्य भाषेतील शिवीगाळ व मारहाणीच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते नरेश सीताराम भोरे (वय ४८, रा. सोलगे मळा, शहापूर) यांनी सोमवारी नगरपालिकेच्या पार्किंग प्रवेशद्वारात पेटवून घेतले. त्यात ते गंभीर जखमी झाले. सांगली येथील सिव्हील रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे.याबाबत माहिती अशी, १९ ऑक्टोबरला शहापूर परिसरातून अमर प्रकाश लाखे हा घंटागाडीचालक मृत डुक्कर घंटागाडीला बांधून रस्त्यावरून ओढत नेत होता. त्यावेळी नरेश भोरे यांनी त्याला तू असे मृत डुक्कर ओढत नेऊ नकोस म्हणून अटकाव केला. त्यावर चिडून संबंधित चालकाने भोरे यांना शिवीगाळ व मारहाण केली. या प्रकाराच्या निषेधार्थ भोरे यांनी नगरपालिकेला संबंधित ठेकेदार कंपनीवर पेटा अ‍ॅनिमल कायद्यांतर्गत कारवाई करावी व संबंधित घंटागाडीचालकावरही कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा २६ ऑक्टोबरला आत्मदहन करू असा इशारा त्यांनी २० ऑक्टोबरला दिला होता. सोमवारी भोरे यांनी नगरपालिकेच्या दक्षिण बाजूच्या पार्किंग मार्गातून आत प्रवेश करून स्वत:ला पेटवून घेतले. त्यामुळे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांसह पालिका कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. त्यांना उपचारासाठी रिक्षातून आयजीएम रुग्णालयात दाखल केले. परंतु, सुमारे ६० टक्के भाजले गेल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सांगली सिव्हील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारांदरम्यान सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर