शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

महाडिक भ्याले म्हणता, तर दारात आल्यावर बाहेर का आला नाही?, अमल महाडिकांचा सतेज पाटलांवर पलटवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 12:25 IST

सभासदच त्यांचा कंडका पाडतील

काेल्हापूर : महादेवराव महाडिक यांना कसबा बावड्यात फिरू देणार नसल्याचे वक्तव्य करणाऱ्या सतेज पाटील यांच्या दारात गेल्यानंतर ते बाहेर आले नाहीत. महाडिक भ्याले होते तर मग घरातून बाहेर का बाहेर आला नाही?, ज्यांच्या राजकारणाची सुरुवात माझ्या वडिलांच्या गाडीचे दार उघडण्यापासून झाली, त्यांना काय घाबरायचे?, आम्ही रडणारे नाही, लढणारे आहोत, समाेरासमाेर लढू, असा पलटवार माजी आमदार अमल महाडिक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.अमल महाडिक म्हणाले, महादेवराव महाडिक यांच्या विचाराने, विश्वासाने तुम्ही पहिली विधानसभा जिंकला. त्यावेळी ते येलूर, पंढरपूरचे आहेत, हे समजले नव्हते का?, सहकारातील देव चोरल्याची वल्गना करणारे शेतकऱ्यांचे सभासदत्व रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले कसे?, त्यांना सहकार टिकवायचा की मोडायचा आहे, हे लक्षात येते.सर्जेराव माने यांनी चारवेळा गट बदलला, महादेवराव महाडिक यांनी सगळे विसरून सोबत घेतले. संचालक, अध्यक्ष होता मग तुम्हाला पोटनियमाची माहिती कशी नव्हती?, आमचा कारभार पसंत नव्हता, एवढेच स्वाभिमानी होता तर राजीनामा का दिला नाही?, असा सवाल महाडिक यांनी केला.तुलना आमच्या कारखान्याची करता, डी. वाय. चे बोलावे, बावड्यातील सभासद मांडुकली गावातील आहेत, बारा वर्षात को जनरेशन असूनही दर दिला. गुऱ्हाळघर क्षेत्रातील कारखाना आहे,

वैर तुमचे आमचे...महादेवराव महाडिक यांच्या गाडीचे दार उघडणारे सतेज पाटील तोल गेल्यासारखे बाेलत आहेत. वैर तुमचे आमचे आहे, त्यात इतरांना घेऊन पडू नका, असा इशाराही महाडिक यांनी दिला.रडीचा डाव पहिल्यांदा तुम्हीच खेळलाआमच्यावर रडीच्या डावाचा आरोप करणाऱ्यांनी १८९९ सभासदांवर हरकत घेतली, त्यावेळीच रडीचा डाव खेळला. सुरुवातीला भूमिका मांडण्यास आम्ही कमी पडलो, मात्र शेवटी न्यायदेवतेने त्या सभासदांना न्याय दिल्याचे महाडिक यांनी सांगितले.

तुमच्या कारभाराची तुलना करावीच लागेलउपपदार्थाशिवाय ‘राजाराम’ कारखाना शेतकऱ्यांना २९०० रुपये दर देतो. आमच्या कारभारावर बोलता त्यावेळी तुमच्या कारभाराचा हिशोब मांडावाच लागेल. तुमच्या डी. वाय. पाटील कारखान्यात बावड्यातील सभासद मांडुकली गावात कसे गेले?, असा सवाल महाडिक यांनी केला.मग, महाविकास आघाडी सोबत का भाजप शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकत नाही, ते कायद्यानुसारच काम करत आहेत. शेतकरी हा सर्वपक्षीय आहे, तुम्हीच महाविकास आघाडीसह ‘गोकुळ’, जिल्हा बँक यंत्रणेचा व डी. वाय. पाटील ग्रुपच्या कर्मचाऱ्यांचा वापर करत पक्षीय पातळीवर निवडणूक नेल्याचा आरोप महाडिक यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकAmal Mahadikअमल महाडिकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील