शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात आढळली छोटी निशाचर, दुर्मीळ पाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:24 IST

कोल्हापूर : सहसा पश्चिम घाटात आढळणाऱ्या पालीच्या एका नव्या प्रजातीचा शोध गोव्याच्या उत्तर पश्चिम घाटात लागला आहे. हे संशोधन ...

कोल्हापूर : सहसा पश्चिम घाटात आढळणाऱ्या पालीच्या एका नव्या प्रजातीचा शोध गोव्याच्या उत्तर पश्चिम घाटात लागला आहे. हे संशोधन करणाऱ्या सरिसृप अभ्यासकांच्या टीममध्ये कोल्हापूरच्या संशोधकाचा समावेश आहे. ‘हेमीफिलोडॅक्टिलस’ कुळातील ही पाल आकाराने छोटी म्हणून ‘स्लेन्डर’ किंवा ‘वर्म गेको’ म्हणून ओळखली जाते. ही पाल निशाचर, दुर्मीळ आणि प्रदेशनिष्ठ असल्यामुळे तिच्या संरक्षणाची गरज सरिसृप संशोधकांनी व्यक्त केली आहे.

‘हेमीफिलोडॅक्टिलस’ कुळातील या पालींचा अधिवास प्रामुख्याने पश्चिम घाटाच्या दक्षिण पट्ट्यांत आढळतो. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातील (उत्तरेकडील) पश्चिम घाटामधून या कुळातील पालींची नोंद यापूर्वी नव्हती. मात्र, या कुळातील ही नवी पाल त्यांच्या मूळ अधिवासापासून ५६० किमी दूर गोव्यामध्ये आढळल्याने संशोधकांना नवे संदर्भ मिळाले आहेत. कोल्हापूर येथील सरिसृप अभ्यासक अक्षय खांडेकर यांच्यासह दिकांश परमार, नितीन सावंत, इशान अग्रवाल यांनी ही प्रजात शोधली असून यासंदर्भातील शोधप्रबंध मंगळवार, दि. ३१ ऑगस्ट २०२१ रोजी ‘झूटॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.

निशाचर व प्रदेशनिष्ठ पाल

३० ते ३५ एमएम इतक्या छोट्या आकाराच्या या पालीची ही प्रजात उत्तर गोव्यातील गोवा विद्यापीठ आणि दक्षिण गोव्यातील चांदोर जिल्ह्यामध्येच आढळल्याने तिचे नामकरण ‘हेमीफिलोडॅक्टिलस गोवाएन्सिस’ असे केले आहे. ही पाल निशाचर असून, झाडावर आणि भिंतींवरही आढळते. गोवा विद्यापीठाच्या परिसरात दिकांश परमार यांना प्रथम ही पाल दिसली. ही माहिती ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन’चे संशोधक अक्षय खांडेकर आणि इशान अग्रवाल यांना मिळाल्यानंतर त्यांनी या पालीचा आकारशास्त्र आणि इतर अभ्यास केला तेव्हा, ही पाल नवीन असल्याचे स्पष्ट झाले. आता तिला ‘गोवा स्लेन्डर गेको’ या नावाने ओळखले जाईल.

कोट

या पालीचे कूळ प्रथमच उत्तर पश्चिम घाटामध्ये आढळले असून, ते गोव्यात केवळ दोनच ठिकाणी सापडल्याने ही पाल दुर्मीळ व प्रदेशनिष्ठ आहे. पश्चिम घाटातही या कुळातील पालींचा अधिवास असण्याची शक्यता असल्यामुळे त्याचा अभ्यास करणे व तो सुरक्षित करणे गरजेचे आहे.

-अक्षय खांडेकर,

सरिसृप संशोधक, ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन, कोल्हापूर.

------------

फोटो : 02082021-kol-gekkonidae-goa

फोटो ओळी : गोवा स्लेन्डर गेको

02082021-kol-Akshay Khandekar

फोटो ओळी : अक्षय खांडेकर, सरिसृप संशोधक.

020921\02kol_4_02092021_5.jpg~020921\02kol_5_02092021_5.jpg

02082021-kol-gekkonidae-goaहेमीफिलोडॅक्टिलस गोवाएन्सिस'~02082021-kol-Akshay Khandekar