शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-गारगोटी मार्गावर झाडांची कत्तल

By admin | Updated: March 7, 2017 00:16 IST

रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण : पन्नास वर्षांपूर्वी रस्त्याच्या दुतर्फा केली होती वेगवेगळ्या जातीच्या वृक्षांची लागवड

शिवाजी सावंत ल्ल गारगोटीकोल्हापूरहून गारगोटीकडे येताना रस्त्याच्या दुतर्फा असलेली गर्द हिरव्या झाडांची रांग पाहिली की, प्रवाशांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. मनाबरोबरच डोळ््याला आल्हाददायक वाटणारे हे वृक्ष रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामामुळे तोडले जात आहेत. कोल्हापूर-गारगोटी-गडहिंग्लज-गारगोटी-पाटगाव या महामार्गाच्या रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी या रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला वेगवेगळ्या जातीच्या वृक्षांची लागवड केली होती. निलगिरी, आॅस्टे्रलियन बाभूळ, गुलमोहर, वटवृक्ष, बाभूळ, आंबा याशिवाय आणखी काही स्थानिक प्रजातींचा समावेश होता. ही झाडे डेरेदार व उंच झाली होती. यामुळे रस्त्यावर नेहमी सावली असायची. भुदरगड तालुका तर कोकणाचे प्रवेशद्वार समजले जाते. गारगोटीपासून पाटगावकडे चालल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे इतकी घनदाट होती की, रात्री अपरात्री एकट्याने प्रवास करताना भीती वाटावी. कूरपासून नांगरगावमार्गे पिंपळगावपर्यंत तब्बल एक हजार दोनशे पंचेचाळीस झाडे होती. पाटगावपर्यंत हा आकडा कदाचित अर्धा ते पाऊण लाखांपर्यंत असेल. ही झाडे गारगोटी-कोल्हापूर मार्गाच्या रुंदीकरणामुळे सध्या तोडली जात आहेत. सामाजिक बांधकाम विभागाचे उपअभियंता के. डी. मुधाळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, रस्त्याचे रुंदीकरण होत असताना रस्त्याच्या लगत असणारी झाडे नाईलाजाने तोडावी लागत आहेत. या झाडांमुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो, पण येत्या पावसाळ्यात लोकसहभागातून वृक्षारोपण करून हा मार्ग पुन्हा एकदा हरित करण्यात येणार आहे. जोतिबा कडव यांचे कष्टगारगोटीपासून आकुर्डेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा जी झाडे सध्या दिसतात त्यामागे सा. बां. विभागाचे कर्मचारी, मैलकुली जोतिबा कडव (आकुर्डे) यांचे प्रचंड कष्ट आहेत. त्यांनी उन्हातान्हात घागरीने पाणी आणून ही झाडे जगवली व ती वर्षांनुवर्षे मुलाबाळाप्रमाणे वाढवली. त्यांच्या स्मृतीची साक्ष देत ही झाडी मोठ्या अभिमानाने उभी आहेत. ते सध्या हयात नाहीत.