शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

सहा. कामगार आयुक्त कार्यालयाकडे तेरा पदे रिक्त

By admin | Updated: November 2, 2015 00:35 IST

कामगारांचे अनेक खटले प्रलंबित : हातकणंगले, शिरोळ तालुक्यांतील कामगारांची गैरसोय

इचलकरंजी : शहरातील सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडे तब्बल तेरा पदे रिक्त आहेत. त्यामध्ये सहायक कामगार आयुक्तांबरोबर सरकारी कामगार अधिकारी, दुकान निरीक्षक, आदींचा समावेश असल्याने हातकणंगले व शिरोळ या दोन तालुक्यांतील कामगारांचे अनेक खटले प्रलंबित असून, कामगार वर्गाची मोठी कुचंबणा होत आहे. हातकणंगले व शिरोळ तालुक्यांमध्ये हजारो दुकाने व आस्थापनाची नोंदणी, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, तसेच मोठमोठे खासगी उद्योग धंदे आहेत. त्याचप्रमाणे इचलकरंजी शहरात सुमारे दीड लाख यंत्रमाग असून, या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संख्या ७५ हजारांहून अधिक आहे. त्यामुळे येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडे कामगारांच्या बाबतीत असलेली अनेक प्रकरणे नोंद होत असतात. मात्र, सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडे पुरेसे अधिकाऱ्यांचे संख्याबळ नसल्याने त्यांची निर्गत होत नाही. याशिवाय दोन्ही तालुक्यांत नोंद असलेली दुकाने व आस्थापनांना अधिकाऱ्यांकडून भेटी देणे व त्यांच्या तक्रारीचे निवारण करणे, हेसुद्धा प्रचंड काम आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये इचलकरंजी शहर व आसपासच्या परिसरात असलेली कामगारांची चळवळ आणि त्यातून होणारी जनआंदोलने यांचीही संख्या मोठी आहे. अशा पार्श्वभूमीवर येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडे सुमारे २१ पदे मंजूर आहेत. त्यातील एक सहायक कामगार आयुक्त, चार सरकारी कामगार अधिकारी, नऊ दुकान निरीक्षक, चार लिपिक व चार शिपाई ही पदे कायमस्वरूपी आहेत. मात्र, या कार्यालयाकडे एक सरकारी कामगार अधिकारी, दोन दुकान निरीक्षक, दोन लिपिक व दोन शिपाई इतकीच पदे कार्यरत आहेत. उर्वरित तेरा पदे रिक्त आहेत. परिणामी येथे असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामगारांचे तंटे आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठीचा प्रचंड ताण आहे. परिणामी कामगारांच्या तक्रारी वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. म्हणून कामगार कार्यालयाकडील सर्व पदे भरण्यात यावीत, अशी मागणी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे तज्ज्ञ सदस्य भरमा कांबळे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)