श्रीपतराव बोंद्रे-दादा जन्मशताब्दीचा उद्या सांगता समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:19 IST2020-12-27T04:19:09+5:302020-12-27T04:19:09+5:30

कोपार्डे : माजी कृषी राज्यमंत्री स्व. श्रीपतराव बोंद्रे (दादा) यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता उद्या, सोमवारी होत असून, त्यानिमित्त हॅप्पी ...

Shripatrao Bondre-Dada birth centenary closing ceremony tomorrow | श्रीपतराव बोंद्रे-दादा जन्मशताब्दीचा उद्या सांगता समारंभ

श्रीपतराव बोंद्रे-दादा जन्मशताब्दीचा उद्या सांगता समारंभ

कोपार्डे : माजी कृषी राज्यमंत्री स्व. श्रीपतराव बोंद्रे (दादा) यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता उद्या, सोमवारी होत असून, त्यानिमित्त हॅप्पी होम,रंकाळा, कोल्हापूर येथे प्रतिमापूजन, रक्तदान शिबिर, स्मरणिका वाटप असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर सेंट्रल को-ऑप. कंझूमर्स स्टोअर्सचे चेअरमन अभिषेक चंद्रकांत बोंद्रे यांनी दिली आहे.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सकाळी १० वाजता स्व. श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. तसेच रक्तदान शिबिराचे उद्घाटन दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी स्व. बोंद्रे दादा यांच्या जीवनावर आधारित सचित्र स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्व बोंद्रेप्रेमी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चेअरमन अभिषेक बोंद्रे आणि संचालिका रमा बोंद्रे यांनी केले आहे.

Web Title: Shripatrao Bondre-Dada birth centenary closing ceremony tomorrow