संक्षिप्त वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:45 IST2021-03-04T04:45:07+5:302021-03-04T04:45:07+5:30

जयसिंगपूर : येथील चंद्रनारायण बलदवा इंग्लिश स्कूलमधील श्रेया उमेश दाइंगडे या विद्यार्थिनीने राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळविले. या स्पर्धेत तिने ...

Short story | संक्षिप्त वृत्त

संक्षिप्त वृत्त

जयसिंगपूर : येथील चंद्रनारायण बलदवा इंग्लिश स्कूलमधील श्रेया उमेश दाइंगडे या विद्यार्थिनीने राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळविले. या स्पर्धेत तिने चौथा क्रमांक पटकाविला असून, तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला स्कूल समितीचे अध्यक्ष नारायणदास बलदवा, मुख्याध्यापक ए.आर. पाटील, राहुल डिग्रजे यांचे मार्गदर्शन लाभले.

------------------

गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारावेत

शिरोळ : येथील शिरोळ बंधारा ते कुरुंदवाडकडे जाणाऱ्या मार्गावर गतिरोधक बसविण्यात आले आहेत. मात्र, रात्रीच्या वेळेस या गतिरोधकांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे या गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. कुरुंदवाडहून शिरोळकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने या मार्गावरून दुचाकीस्वारांची मोठी वाहतूक होत असते.

उन्हाची तीव्रता वाढली

शिरोळ : सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याने लिंबू सरबत, ज्यूससह थंड पेय घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. दुपारच्या वेळेस तर अनेक नागरिक बाहेर जाणेही टाळत आहेत. उन्हामुळे अनेक शेतकरी सकाळच्या सत्रात शेतातील कामे आटोपत आहेत.

Web Title: Short story