शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

शिवाजी विद्यापीठाचा ५६ वा दीक्षांत समारंभ सोहळ्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 4:01 PM

नववारीतील तरुणी, खादीचे कपडे घातलेले प्राध्यापक व तरुण, टाळ-मृदंगाच्या साथीत अवघा आसमंत दुमदुमून टाकणारा ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष अशा भावपूर्ण वातावरणात निघालेल्या ग्रंथदिंडीने शिवाजी विद्यापीठाचा ५६ वा दीक्षांत समारंभच्या सोहळ्यास गुरुवारी सकाळी सुरुवात झाली.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाचा ५६ वा दीक्षांत समारंभ सोहळ्यास प्रारंभग्रंथदिंडीच्या माध्यमातून प्रबोधनाचा जागर

कोल्हापूर : नववारीतील तरुणी, खादीचे कपडे घातलेले प्राध्यापक व तरुण, टाळ-मृदंगाच्या साथीत अवघा आसमंत दुमदुमून टाकणारा ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष अशा भावपूर्ण वातावरणात निघालेल्या ग्रंथदिंडीने शिवाजी विद्यापीठाचा ५६ वा दीक्षांत समारंभच्या सोहळ्यास गुरुवारी सकाळी सुरुवात झाली.दीक्षांन्त समारंभानिमित्त कमला कॉलेज येथून सकाळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे पूजन करून दिंडीस प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पारंपारिक वेशभूषा, वाचन संस्कृतीचा संदेश देणारे फलक हातात घेवून युवक - युवतींंनी ग्रंथदिंडीच्या माध्यमातून प्रबोधनाचा जागर केला.राजारामपुरी पहिली गल्ली, माऊली पुतळा चौक, सायबर चौक, दूरशिक्षण केंद्रमार्गे दिंडी विद्यापीठात आली. दिडीच्या अग्रभागी फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये ग्रंथ ठेवण्यात आले होते. वाचनसंस्कृतीबाबत प्रबोधन करणारे फलकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले. जय जवान, जय किसान, जय शिवाजी, जय भवानी अशा घोषणांनी वातावरणात स्फुलिंग संचारले.शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर दिंडी आल्यानंतर येथे विद्यापीठाच्या महिला कर्मचारी व मुलींनी ही ग्रंथदिंडी खांद्यावर घेतली. त्यानंतर लोककला केंद्रात ग्रंथदिंडीतील पालखी ठेवण्यात आली.

या ग्रंथदिंडीत शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, प्राचार्य डॉ. क्रांतीकुुमार पाटील, डॉ. डी. के. गायकवाड, डॉ. पी.टी. गायकवाड यांच्यासह विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गांधी टोप्या....विविध महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. तसेच विद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या गांधी टोप्या हेच ग्रंथदिंडीचे प्रमुख आकर्षण ठरले. ‘मााणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक’, ‘ग्रंथ आमुचे साथी’, ‘ग्रंथ आमुचे हाती’ अशा घोषणा करीत ग्रंथदिंडी पुढे सरकत होती. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर