शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
लखनौच्या मैदानात पावसाचा खेळ अन् मिचेल मार्श नावाचं वादळ! सगळं संपल्यावर ठोकली विक्रमी सेंच्युरी
5
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
6
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
7
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
9
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
10
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
11
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
12
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
13
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
14
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
15
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
16
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
17
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
18
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
20
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी पेठेचा रस्ता बिकट, महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:23 IST

कोल्हापूर : दाेन प्रभागांच्या सीमारेषेवर एखादा रस्ता असेल आणि तो मोठ्या रहदारीचा असेल, तर त्याची ‘वाट’ कशी लागते, हे ...

कोल्हापूर : दाेन प्रभागांच्या सीमारेषेवर एखादा रस्ता असेल आणि तो मोठ्या रहदारीचा असेल, तर त्याची ‘वाट’ कशी लागते, हे पाहायचे असेल, तर तुम्हाला शिवाजी पेठेत जावे लागेल. शिवाजी पेठेतील प्रमुख रस्ता असलेल्या बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक ते उभा मारुती चौक रस्ता अक्षरश: खड्ड्यात हरविला आहे. गेल्या काही महिन्यांत शहरात रस्त्यांवर ३० ते ४० कोटी खर्च करणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाचे या रस्त्याकडे अक्षरश: दुर्लक्ष झाले आहे.

शिवाजी पेठ म्हणजे अनेक चळवळीचे उगमस्थान मानले जाते. अन्यायाविरुद्ध संघर्ष हा या पेठेचा बाणा आहे; परंतु गेल्या एक ते दीड वर्षापासून याच पेठेतील बिनखांबी गणेश मंदिर ते उभा मारुती चौक हा प्रमुख रस्ता अत्यंत खराब झाला आहे. बनखांबी ते निवृत्ती चौक या रस्त्यावर एक ते दोन फूट लांबीचे आणि तीन ते चार इंच खोलीचे खड्डे पडले आहेत. दुचाकीस्वारांची हाडे खिळखिळी करणारे खड्डे अपघातलाही आमंत्रण देणारे ठरले आहेत.

निवृत्ती चौक ते उभा मारुती चौक रस्ता खड्ड्यांनी तर भरला आहेच, शिवाय बऱ्याच ठिकाणी त्याचे अस्तित्वही नष्ट झाले आहे. येथे रस्ता होता यावर कोणाचा विश्वासदेखील बसणार नाही, इतकी वाईट परिस्थिती या रस्त्याची झाली आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यावर महानगरपालिकेचे गांधी मैदान विभागीय कार्यालय क्रमांक- १ असून, कार्यालयात उपशहर अभियंता बसतात; पण ते कार्यालयात कोठून येतात व कोठून जातात समजत नाही. कारण त्यांनाही या रस्त्याची दयनीय अवस्था दिसलेली नाही.

रस्त्याची दक्षिण बाजू ही फिरंगाई प्रभागात, तर उत्तर बाजू तटाकडील तालीम प्रभागात येते. या दोन प्रभागांच्या सीमेवरच रस्ता आहे. जेथे प्रभागाच्या सीमेवर रस्ते असतात तेथील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यात शिवाजी पेठेचा रस्ता म्हणजे उत्तम नमुना आहे. तीन वर्षांपूर्वी हा रस्ता केला होता म्हणून या वर्षात धरलेला नसल्याचे एका माजी नगरसेवकांनी सांगितले.

उभा मारुती अंधारात

उभा मारुती चौकात हायमास्ट दिवे लावण्यात आले होते; परंतू २०२० मध्ये शिवजयंतीवेळी ते काढण्यात आले. त्यानंतर हे दिवे लावले गेले नाहीत. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा असा हा चौक रात्री अंधरात असतो.

फोटो क्रमांक - ०३०४२०२१-कोल-शिवाजी पेठ/ शिवाजी पेठ ०१

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक ते बिनखांबी गणेश मंदिर हा रस्ता अत्यंत खराब झाला असून, त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. त्याच्या दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)