शेतकरी विरोधकांना शिवसेना ठेचून काढेल : मुरलीधर जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:38 IST2020-12-13T04:38:29+5:302020-12-13T04:38:29+5:30

इचलकरंजी : शेतकर्‍यांविषयी बेताल वक्तव्य करणार्‍या खासदार रावसाहेब दानवे यांना भाजपने वेळीच आवर घालावा, अन्यथा अशा शेतकरी विरोधकांना शिवसेना ...

Shiv Sena will crush the farmers' opposition: Murlidhar Jadhav | शेतकरी विरोधकांना शिवसेना ठेचून काढेल : मुरलीधर जाधव

शेतकरी विरोधकांना शिवसेना ठेचून काढेल : मुरलीधर जाधव

इचलकरंजी : शेतकर्‍यांविषयी बेताल वक्तव्य करणार्‍या खासदार रावसाहेब दानवे यांना भाजपने वेळीच आवर घालावा, अन्यथा अशा शेतकरी विरोधकांना शिवसेना ठेचून काढेल, असा इशारा जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिला. इंधन दरवाढीविरोधात निदर्शने आणि मंत्री दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळा दहन आंदोलनावेळी ते बोलत होते.

येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात शिवसेनेच्यावतीने इंधन दरवाढीविरोधात निदर्शने केली. तसेच खासदार दानवे यांचा तीव्र शब्दांत निषेध केला. यावेळी आंदोलकांनी खासदार दानवे यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न करताना पोलीस आणि आंदोलकांच्यात किरकोळ झटापट झाली. आंदोलनात नगरसेवक रवींद्र माने, आण्णा बिलुरे, विजय जोशी, धनाजी मोरे, महेश बोहरा, मधुमती खराडे, मंगल मुसळे, शोभा कोलप, आदी सहभागी झाले होते.

Web Title: Shiv Sena will crush the farmers' opposition: Murlidhar Jadhav