शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने एकदाच काय ते ठरवावे

By admin | Updated: June 24, 2015 00:49 IST

रावसाहेब दानवे : कोल्हापुरातील सेनेच्या निर्धार मेळाव्यातील टीकेचा निषेध

कणकवली : संख्याबळावर कोणता पक्ष मोठा हे ठरते. त्यानुसार युतीमध्ये आमची आता मोठ्या भावाची भूमिका आहे. पक्षातील वेगवेगळ्या नेत्यांकडून टीकात्मक वक्तव्ये करण्यापेक्षा शिवसेनेच्या नेतृत्वाने एकदाच आपली भूमिका जाहीर करावी. कोल्हापूर येथील शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेचा निषेध करतो, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्टपणे सांगितले. सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. युतीमध्ये भाजपची एकाधिकारशाही चालत असल्याच्या आरोपाचे दानवे यांनी खंडन केले. नेमक्या कोणत्या मुद्द्यावर अधिकार गाजवला तो शिवसेनेकडून सांगितल्यास आरोपाचे उत्तर दिले जाईल. दर आठवड्याला मुख्यमंत्र्यांसोबत युतीच्या मंत्र्यांची बैठक होत असते, असे दानवे म्हणाले. पक्षाने दिलेले लक्ष्य पूर्ण करून १ कोटी पाच लाख सदस्य संख्या गाठण्यात आली आहे. या सदस्यांना संपर्काचे महाभियान सुरू आहे. विधानसभा निवडणुकीतील निकालाने खचून न जाता कार्यकर्त्यांना ताकद देणे व भाजपची पाळेमुळे रूजविणे हा या संपर्क दौऱ्याचा उद्देश आहे. कोकण विकासाचा संकल्प पूर्ण केला जाईल.यावेळी प्रवक्ते माधव भांडारी, प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू, राजन तेली, बाळ माने, माजी आमदार प्रमोद जठार, मधुकर चव्हाण, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी) सिंधुदुर्गात मंत्रिमंडळ बैठक सिंधुदुर्गातील विविध प्रश्नांसाठी पुन्हा दौरा करण्यात येईल. आताच्या दौऱ्यात ज्या सूचना येतील त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहे. अ‍ॅक्शन प्लॅन तयार करून मंत्रिमंडळाची बैठक सिंधुदुर्गात घेण्याचा आमचा मनोदय आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पर्यटनाला चालना देण्यात येईल. याशिवाय पक्ष म्हणून प्रदेश कार्यकारिणीची बैठक कोकणात घेण्यात येईल. पदवी परत करण्याचा प्रश्नच नाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावरील आरोपात तथ्य नाही. त्यांनी पदवीच्या आधारे कोणताही लाभ घेतलेला नाही. ते जे शिकले ते त्यांनी लिहिले. पदवी परत करण्याचा प्रश्न येत नाही. गरिबाची मुले पृथ्वीराज चव्हाणांसारखी विदेशात जाऊ शकत नाहीत. उपजीविकेसाठी मिळेल तिथे अ‍ॅडमिशन घेतात. जेव्हा सरकारसमोर हा प्रश्न येईल. तेव्हा पाहून घेऊ, असे दानवे यांनी सांगितले.