शिवसेनेच्या वतीने चिकोत्रा खोऱ्यात पूरग्रस्तांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:29 IST2021-08-18T04:29:40+5:302021-08-18T04:29:40+5:30

सेनापती कापशी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातील पूरग्रस्तांसाठी पाठवलेली मदत चिकोत्रा खोऱ्यातील गावागावांत पोहोचवण्याचं काम शिवसैनिकांनी केले ...

Shiv Sena helps flood victims in Chikotra valley | शिवसेनेच्या वतीने चिकोत्रा खोऱ्यात पूरग्रस्तांना मदत

शिवसेनेच्या वतीने चिकोत्रा खोऱ्यात पूरग्रस्तांना मदत

सेनापती कापशी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातील पूरग्रस्तांसाठी पाठवलेली मदत चिकोत्रा खोऱ्यातील गावागावांत पोहोचवण्याचं काम शिवसैनिकांनी केले आहे.

त्याचाच एक भाग म्हणून चिकोत्रा खोऱ्यातील हमीदवाडा, नंद्याळ, हसूर, बोळावी, बोळावीवाडी, मांगनूर (ता. कागल) आदी गावांत शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, उप तालुकाप्रमुख राजेंद्र येजरे, युवा सेनाप्रमुख समीर देसाई, राहुल टिकले, युवराज येजरे, महिला संघटिका सीमाताई गोरे, हमीदवाडा संचालक आप्पासाहेब तांबेकर, रवी येजरे, आर.डी. पाटील यांनी पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवली.

फोटो:- नंद्याळ (ता.कागल ) येथील पूरग्रस्तांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, उपतालुकाप्रमुख राजेंद्र येजरे, आर. डी. पाटील, रवींद्र येजरे यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले.

१७ नंद्याळ शिवसेना

Web Title: Shiv Sena helps flood victims in Chikotra valley