पंचगंगा स्मशानभूमीस शेणी, लाकूड दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:20 IST2021-05-30T04:20:27+5:302021-05-30T04:20:27+5:30

कोल्हापूर : येथील पंचगंगा स्मशानभूमीस संभाजीनगर प्रभागातील नागरिकांतर्फे सहा हजार शेणी आणि दहा टन जळावू लाकूड दान ...

Sheni, wood donation to Panchganga cemetery | पंचगंगा स्मशानभूमीस शेणी, लाकूड दान

पंचगंगा स्मशानभूमीस शेणी, लाकूड दान

कोल्हापूर : येथील पंचगंगा स्मशानभूमीस संभाजीनगर प्रभागातील नागरिकांतर्फे सहा हजार शेणी आणि दहा टन जळावू लाकूड दान देण्यात आले. महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर यांच्याकडे शेणी, लाकडे प्रातिनिधीक स्वरूपात सुपूर्द करण्यात आले. संभाजीनगर रिक्षा स्टॉपजवळ हा छोटासा कार्यक्रम झाला.

शहरात कोरोनाने मृत झालेल्या शवावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाते. यासाठी शेणी, लाकडे दान करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले होते. याला प्रतिसाद देत माजी नगरसेवक किरण नकाते, माजी नगरसेविका माधुरी नकाते, ज्येष्ठ नागरिक, युवकांनी पुढाकार घेवून शेणी आणि लाकडे संकलित केली होती. ते दान देण्याच्या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक प्रकाश चव्हाण, हरी शेळके, नझीर मुल्ला, जी. एस. पाटील, आर. डी. पाटील, आनंदा कुरडे, दामोदर जाधव, गोविंद प्रभू, अमर नकाते आदी उपस्थित होते.

फोटो आणि फोटो ओळी

फोटो : २९०५२०२१- कोल- पंचगंगास्मशानभूमी

Web Title: Sheni, wood donation to Panchganga cemetery