शैलेश बलकवडे यांची आंबा चेकपोस्टला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:26 IST2021-04-27T04:26:22+5:302021-04-27T04:26:22+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी पोलिसांना रत्नगिरी जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणारी वाहने, नागरिक यांची चौकशी चेकपोस्टवर केली जात आहे. ...

Shailesh Balkwade visits Mango Check Post | शैलेश बलकवडे यांची आंबा चेकपोस्टला भेट

शैलेश बलकवडे यांची आंबा चेकपोस्टला भेट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी पोलिसांना रत्नगिरी जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणारी वाहने, नागरिक यांची चौकशी चेकपोस्टवर केली जात आहे. त्यासाठी पोलिसांनी येथे बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी बंदोबस्ताची पाहणी केली. पोलीस कर्मचाऱ्यांना सोयी, सुविधा यांची विचारपूस करून त्यांच्या जेवणाची महिती घेतली. दुपारी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत जेवण घेतले. शाहूवाडी पोलिसांच्या कामाचे कौतुक केले. नागरिकांना कोरोनाची माहिती समजावून सांगा, नागरिकांचे मित्र बनून काळजी घ्या, मी तुमच्या पाठीशी आहे, असे बलकवडे यांनी सांगितले.

यावेळी पोलीस निरीक्षक विजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख, प्रियांका सराटे, आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Shailesh Balkwade visits Mango Check Post