शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

तीन अनाथ मतिमंद मुलींचे लैंगिक शोषण

By admin | Updated: January 10, 2015 00:58 IST

शिक्षकाचे कृत्य : परितेमधील अंकुर शाळेच्या वसतिगृहातील प्रकार

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -परिते (ता. करवीर) येथील अंकुर मतिमंद मुलांच्या शाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या तीन अनाथ मतिमंद मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे आज, शुक्रवारी उघडकीस आले. समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या पथकाने आज शाळेत जाऊन चौकशी केली. त्यावेळी संबंधित तीन मुलींनी लैंगिक शोषण झाल्याची कबुली दिली. तिन्ही मुलींना सायंकाळी उशिरा कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी दाखल केले. शाळेतील शिक्षकानेच शोषण केल्याचे अत्याचारग्रस्त मुलींनी सांगितले.
येथील कसबा बावड्यामधील स्वयंम शाळेत अनाथ मतिमंद १३ मुली होत्या. त्या संस्थेला अनुदान नव्हते. त्यामुळे जुलै २०१४ मध्ये संस्थेने शाळा बंद केली. त्यानंतर मुलींच्या पालकत्वाचा प्रश्न निर्माण झाला. बालसुधारगृहात त्यांची रवानगी करण्यात आली. काही दिवस त्या मुली तेथे राहिल्या. सुधारगृहात त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास करण्याची सुविधा नसल्याने जिल्हा परिषद समाजकल्याण प्रशासनाने परितेमधील अंकुर मतिमंद मुलांच्या शाळेत या मुलींना दाखल केले. तेथे वसतिगृहात राहून मुली शिकत होत्या. अशा संस्थेत शिकणाऱ्या मुली या शासनकन्याच असतात. कारण शासनच त्यांचे पालक असते. त्यामुळे वसतिगृहातील अशा प्रकरणाने सरकारी यंत्रणाही हादरली आहे.
दरम्यान, ३ जानेवारीला एका मुलीवर शिक्षकाने अत्याचार करत लैंगिक शोषण केले. पीडित मुलगी वसतिगृहातून बाहेर पडली. ती येथील बालसुधारगृहात आली. ती मुलगी एका कर्मचाऱ्याच्या मदतीने गुरुवारी येथील समाजकल्याण विभागात येऊन अधिकाऱ्यांना सर्व प्रकार सांगितला. आज, सकाळी समाजकल्याण अधिकारी सुंदरसिंह वसावे यांच्यासह महिला कर्मचाऱ्यांसह पथकाने शाळेला भेट दिली. मुख्याध्यापक संभाजी अतिग्रे, अध्यक्ष विजय कांबळे, शिक्षक कृष्णा भोसले यांच्याकडे चौकशी करून रितसर जबाब नोंदवून घेतला. ३ जानेवारीला मुलगी वसतिगृहातून बाहेर पडली असतानाच पोलिसांत वर्दी का दिली नाही याची विचारणा केली. चौकशीत मुलींनी लैंगिक शोषण झाल्याचे सांगितल्याचे समाजकल्याण विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे तिन्ही मुलींना सायंकाळी सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी दाखल केले. त्या मुली १८ वर्षांवरील आहेत.


किती दिवसांपासून अत्याचार...
लैंगिक शोषण असाह्य झाल्याने ३ रोजी वसतिगृहातून मुलगी बाहेर पडल्याने हा प्रकार उघड झाला. तीन मुलींचे शोषण झाल्याचेही पुढे आले. परंतु, किती दिवसांपासून त्या तीन मुलींचे शोषण होत होते हे आता तपासात
पुढे येणार आहे. वैद्यकीय तपासणीनंतर
रात्री उशिरा लैंगिक शोषण केलेल्या शिक्षकाविरुद्ध पोलिसांत तक्रार करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
काळीमा लावणारे कृत्य..
अनाथ आणि मतिमंद अशा मुलींच्या असाह्यतेचा फायदा घेऊन शिक्षकाने अत्याचार करत माणुसकीला आणि शिक्षकीपेशालाच काळीमा फासण्याचे काम केले आहे. तो शिक्षक जवळच्या गावचा आहे. शिवाय तो संस्थाचालकाचा नातेवाईकच असल्याचे समजते. पोलिसांकडे प्रकरण केल्यानंतर आणखी कारनामे पुढे येण्याची शक्यता आहे.



लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या मुलीने महिलेसोबत गुरुवारी माझ्याकडे तोंडी तक्रार केली. त्याची दखल घेऊन आज मी परिते (ता. करवीर) येथील अंकुर मतिमंद मुलांच्या शाळेच्या वसतिगृहाला भेट दिली व चौकशी केली. चौकशीत मुलींनी लैंगिक शोषण केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे वैद्यकीय तपासासाठी मुलींना सीपीआरला पाठविले आहे. अधिक तपासासाठी पोलिसांतही फिर्याद देणार आहे.
- सुंदरसिंह वसावे, समाजकल्याण अधिकारी