जिल्ह्यात कोरोनाचे नवे सात रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:22 IST2021-02-15T04:22:44+5:302021-02-15T04:22:44+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, रविवारी चोवीस तासांत कोरोनाच्या नव्या सात रुग्णांची भर पडली. त्यामध्ये कोल्हापूर ...

Seven new corona patients in the district | जिल्ह्यात कोरोनाचे नवे सात रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे नवे सात रुग्ण

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, रविवारी चोवीस तासांत कोरोनाच्या नव्या सात रुग्णांची भर पडली. त्यामध्ये कोल्हापूर शहरातील चौघांचा समावेश आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव आता ओसरला आहे, तरीही थंडी वाढू लागल्याने प्रत्येक नागरिकाने स्वत:ची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून आवाहन करण्यात येत आहे. रविवारी चोवीस तासांत जिल्ह्यात सुमारे ७ नवे रुग्ण वाढले. त्यामध्ये कोल्हापूर शहरातील चौघांचा, राधानगरी तालुक्यातील एकाचा व नगरपालिका हद्दीतील दोघांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही ५०,००८५ वर पोहोचली आहे. यामध्ये डिसचार्ज दिलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ४८,२२५ पर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण १७२९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर सद्यस्थितीत १३१ जण उपचार घेत आहेत.

Web Title: Seven new corona patients in the district