शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पशुप्रेम अन् माणुसकीचे दर्शन!; हरवलेली म्हैस शेतकऱ्याने परत केली, अन् मालकीणीच्या जीवाची घालमेल थांबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 14:29 IST

हरवलेली दुभती म्हैस सापडली, ललीताचा जीव पडला भांड्यात

राम मगदूम

गडहिंग्लज : साठ हजाराची म्हैस हरविल्यामुळे ‘ती'बेचैन होती. परंतु, एका संवेदनशील शेतकऱ्याच्या गोठ्यात ती सुरक्षित होती. त्यानेच म्हशीच्या मालकीणीचा शोध घेतला आणि म्हैस हवाली केल्याने तिच्या जीवाची घालमेल थांबली. आनंदाश्रुंनी पाणावलेल्या डोळ्यांनी तिने लमाणवाड्याची वाट धरली. कुटुंबांच्या जगण्याचा एकमेव आधार असणारी दुभती म्हैस गवसल्यामुळे ‘ललीता’चा जीव भांड्यात पडला.

हकीकत अशी, नेसरीनजीकच्या हडलगेपैकी लमानवाड्यातील ललीता प्रकाश लमाण यांची म्हैस ४ दिवसापूर्वी बांधलेल्या दोरीसह अंगणातून नजरेआड झाली. त्यामुळे तिला मोठा धक्का बसला. तिने सभोवतीच्या जंगलासह परिसरातील दाहीदिशा धुंडाळल्या. परंतु, म्हैस न सापडल्यामुळे हतबल झाली.

दरम्यान, तावरेवाडीचे उपसरपंच प्रशांत तुरटे यांना रात्री त्यांच्या शेतातील घराजवळ काळ्या रंगाचा प्राणी दिसला. प्रथमदर्शनी गवा रेडा असेल असे त्यांना वाटले. बॅटरीच्या उजेडात गळ्यात दोरी दिसल्यामुळे ती म्हैस असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी शिताफीने पकडून म्हैस आपल्या गोठ्यात बांधली. म्हशीचा फोटो काढून सोशल मिडीयावर शेअर करुन संपर्काचे आवाहन केले.

कानातील बिल्यावरून शोध

म्हैशीच्या कानातील बिल्यावरून तुरटे यांनी शिप्पूरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महेश आंबेकर यांच्या मदतीने माहिती काढली. बेळगाव जिल्ह्यातील कोटजवळील बिद्रेवाडीच्या केंपाण्णा वाणी यांचे नाव समोर आले. बिद्रेवाडीतील आपले नातेवाईक विठ्ठल मोहिते यांच्याकरवी त्यांनी वाणींच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दीड वर्षापूर्वी लमाण यांना म्हैस विकल्याचे सांगितले.
 
दरम्यान, ललीता यांनी हडलगे परिसरातही म्हैसीची शोधाशोध केली होती. त्यामुळे हडलगे येथील दुकानदार भारत पाटील यांच्याकडून लमाणवाड्यातील म्हैस हरवल्याचे समजले. त्यावरून तुरटे यांनी ललीता यांना बोलावून घेतले आणि म्हैस त्यांच्या हवाली केली.

‘थाना’वरून ओळख पटली

म्हैस तुमचीच कशावरून ? विचारताच ललीताने कानडीतून म्हैशीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तुरटेंना तिची भाषा समजली नाही. ललीताची मुलगी सुनिताने मराठीतून म्हैशीची नेमकी ओळख सांगितली. म्हैशीला चारऐवजी पाच ‘थानं’ असून पाचव्या लहान थानातूनही दूध येते, असे सांगितले. खात्रीसाठी तुरटेंनी त्यांना गोठ्यात नेले. तीनवेळचे दूध तटल्यामुळे हंबरणारी म्हैस ललीताने पाठीवरून हात फिरवताच शांत झाली. तिने म्हैशीचे दूधही काढून दाखविले.

म्हशीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह

ललीता यांचे पती प्रकाश यांचे कांही वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे आजारी सासू व मुलींच्या पालनपोषणाची जबाबदारी तिच्यावरच आहे. मोलमजुरीसह म्हैशीच्या दूधावरच कुटूंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. दिवसाला ६ लिटर दूध देणारी म्हैस पुन्हा सापडल्यामुळे तिने देवाच्या रुपात भेटलेल्या  तुरटे यांचे आभार मानले.

पशुप्रेम व माणुसकीचे दर्शन!

आजकाल माणसा- माणसातील 'संवाद'ही हरवला आहे.त्यामुळे हरवलेल्या माणसाचा शोध लागणे कठीण झाले आहे.अशा काळात तुरटे यांनी सापडलेल्या म्हैशीला दोन दिवस चारापाणी दिले.स्वत:हुन तिच्या मालकीणीचा शोध घेऊन तिला म्हैस परत दिली.त्यामुळे तुरटे यांचे पशुप्रेम आणि माणुसकीचे नेसरी परिसरात विशेष कौतुक होत आहे.

म्हैशीच्या दुधावरच ललिता यांच्या कुटुंबाचा चरितार्थ अवलंबून आहे.म्हैस सापडली नसती तर तिचे कुटुंब वाऱ्यावर पडले असते. तिला तिची म्हैस मिळवून देता आली, याचा मनस्वी आनंद आहे. - प्रशांत तुरटे उपसरपंच,तावरेवाडी ता.गडहिंग्लज 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीAnimalप्राणी