शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur ZP Election: कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी महायुती, आघाडीतही गोंधळ; बहुरंगी लढती होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 11:50 IST

जागा वाटपाचा पेच अर्ज माघारीपर्यंत सुरू राहणार असल्याची चिन्हे

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी कागल वगळता अन्य तालुक्यातील चित्र अजूनही नेमकेपणाने स्पष्ट झालेले नाही. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील घटक पक्षांमध्ये अजूनही चर्चेच्या फेऱ्या सुरू असून जागा वाटपाचा पेच अर्ज माघारीपर्यंत सुरू राहणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. दरम्यान, सोमवारपर्यंत जिल्हा परिषदेसाठी जिल्ह्यातून ४१ तर पंचायत समितीसाठी ४२ अर्ज दाखल झाले आहेत.

महायुतीमध्येच सात तालुक्यात सध्या बिघाडी होईल अशी स्थिती असून करवीर, भुदरगड, राधानगरी आणि शिरोळबाबतही अजून निर्णय झालेला नाही. हातकणंगलेमध्ये महायुतीविरोधात महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून विविध नेतेमंडळींच्या ठिकठिकाणी बैठका सुरू आहेत. कोल्हापूरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक महायुतीमधील घटक पक्षांशी चर्चा करत असून काही ठिकाणी जनसुराज्य विरोधात भाजप असेही चित्र निर्माण झाले आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी ८३ उमेदवारी अर्ज दाखल, आजअखेर किती अर्ज वितरित झाले..वाचा

दुसरीकडे आमदार सतेज पाटील यांनी तालुकानिहाय महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा सुरू ठेवली असून महायुतीमधील फाटाफुटीवर ते लक्ष ठेवून आहेत. शिरोळमध्ये शाहू आघाडीच्या चिन्हावर लढायचे की भाजपच्या यावर खल सुरू असून काही छोटे पक्ष आणि संघटना एक, दोन जिल्हा परिषद मतदारसंघापुरते उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याची शक्यता दिसून येत आहे.

लढती बहुरंगी होण्याची चिन्हे

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुकांची संख्या पाहता अनेक ठिकाणी बहुरंगी आणि चित्रविचित्र लढती होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे नेते मंडळींनी बैठकांचा सपाटा लावला असला तरी जागा वाटपावरून स्वतच्या कार्यकर्त्यांचे आणि मित्रपक्षांचेही समाधान करता येईल अशी स्थिती निर्माण झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP Election: Alliances in Disarray, Multi-Cornered Fights Expected

Web Summary : Kolhapur Zilla Parishad elections face disarray within alliances. Seat sharing remains unresolved. Multi-cornered contests are likely as major coalitions struggle to accommodate all aspirants, leading to potential conflicts and diverse electoral battles across constituencies.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी