शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

शालेय शुल्क तपासणी पथक नेमा, अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:18 IST

कोल्हापूर : शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाची अंमलबजावणी करत येत्या ४८ तासांच्या आत शालेय शुल्क तपासणी पथक नेमण्यात यावे. या ...

कोल्हापूर : शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाची अंमलबजावणी करत येत्या ४८ तासांच्या आत शालेय शुल्क तपासणी पथक नेमण्यात यावे. या पथकाने पुढील चार दिवसात आपली तपासणी पूर्ण करून आपल्याकडे अहवाल सादर करावा. अन्यथा पालकांसमवेत आम आदमी पार्टीच्यावतीने घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी बुधवारी दिली. त्याबाबतचे निवेदन त्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना दिले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांची ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. त्यामुळे शाळांचे शिकवणी व्यतिरिक्त इतर खर्च कमी झाले आहेत. काही शाळा पालकांकडून अवाजवी शालेय शुल्काची मागणी करत आहे. अशाप्रकारच्या वसुलीला आळा घालण्यासाठी शालेय शुल्क तपासणी टास्कफोर्स नेमावा, अशी मागणी ‘आप’ने शिक्षण उपसंचालकांकडे केली होती. याला प्रतिसाद देत त्यांनी शालेय शुल्क तपासणी पथक नेमण्याचे आदेश दि. ८ जुलैला दिले होते. त्याबाबत ‘आप’च्या शिष्टमंडळाने बुधवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी लोहार यांची भेट घेतली. शालेय शुल्क तपासणी पथकाने सादर केलेल्या अहवालात ज्या शाळा नियमबाह्य शालेय शुल्क वसूल करत आहेत. त्यांना ती वसुली थांबण्याचे लिखित आदेश व्हावेत. ज्या शाळांनी असे शुल्क वसूल केले आहे. ते पालकांना परत देण्यात यावे, आदी मागण्या शिष्टमंडळाने केल्या. यावेळी उत्तम पाटील, अमरजा पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, विजय हेगडे, दिलीप पाटील, राज कोरगावकर, बसवराज हदीमनी, रविराज पाटील आदी उपस्थित होते.

चौकट

स्पष्ट आदेश द्यावेत

राज्य शासनाने आरटीई प्रतिपूर्ती रक्कम आठ हजार रुपये प्रति विद्यार्थी निश्चित केल्याने प्रवेश देणाऱ्या शाळा वरील फरक पालकांकडे मागणी करत आहेत, अशी मागणी करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी देसाई यांनी केली.

फोटो (१४०७२०२१-कोल-आम आदमी पार्टी) : कोल्हापुरात बुधवारी शालेय शुल्क तपासणीसह विविध मागण्यांचे निवेदन आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना दिले.

140721\14kol_3_14072021_5.jpg

फोटो (१४०७२०२१-कोल-आम आदमी पार्टी) : कोल्हापुरात बुधवारी शालेय शुल्क तपासणीसह विविध मागण्यांचे निवेदन आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना दिले.