शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

लघुपटांतून स्त्री शक्तीचे दर्शन

By admin | Updated: March 8, 2017 16:23 IST

महिला दिनानिमित्तकोल्हापूर बार असोसिएशनतर्फे आयोजन

लघुपटांतून स्त्री शक्तीचे दर्शन महिला दिनानिमित्त आयोजन कोल्हापूर : आपली सोशिक प्रतिमा मोडून अन्यायला प्रतिक ार करीत नवा पायंडा पाडून स्वत:च्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावणाऱ्या स्त्रीचे दर्शन बुधवारी लघुपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांनी अनुभवले. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन व प्रोग्रेसिव्ह लॉयर्स असोसिएशनतर्फे न्यायसंकुलातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात महिला दिनानिमित्त लघुपटांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी दयान इंग दिग्दर्शित बस नं ४४,बॅट शेवा गुईज दिग्दर्शित ‘बिहार्इंड द वॉल’,अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘दॅट डे आफ्टर एव्हरीडे’ हे तीन लघुपट दाखविण्यात आले. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर. जी. अवचट, अ‍ॅड. प्रकाश मोरे, मलिंद कदम, सुनील धुमाळ, मेघा पाटील, विजय लंबोरे, अजित चव्हाण आदी उपस्थित होते. लिफ्टमध्ये अडकून पडलेली मुस्लिम नकाब घेतलेली महिला व एक परदेशी गोरा पर्यटक यांच्यावर आधारित पारंपरिक रूढीवादी विचारांना धक्का देणारा, कपड्यांवरून माणसांची पारख करू नये, असा संदेश ‘बिहार्इंड द वॉल’ हा तुर्की देशातील लघुपट देतो. त्यानंतर चायनीज भाषेतील बस नं ४४ हा लघुपट दाखविण्यात आला. त्यामध्ये समाजाच्या षंढ प्रवृत्तीला धडा शिकविण्यासाठी स्त्री किती टोकाचा निर्णय घेऊ शकते याची प्रचिती या कलाकृतीमधून आली. काही प्रश्न हे सरकारे बदलली. सरकारने उपाययोजना केल्या सुरक्षेत वाढ केली म्हणून सुटणारच नाहीत. ते सोडवायचे असतील तर प्रत्येकाने स्वतपासुनच सुरवात करावी लागेल. अशाच एका प्रश्नाचं उत्तर शोधणारा लघुपट म्हणजे ‘दॅट डे आफ्टर एव्हरीडे’. प्रत्येकवेळी स्त्रीला तु कमकुवत आहेस असे घरापासूनच जाणिव करुन दिल्याने त्या समाजातील दृष्ट प्रवृत्तींना विरोध करण्यास कचरत असतात. परंतु जेव्हा त्या भितीवर मात करुन जेव्हा छेडछाडीविरोधात उभ्या राहतात तेव्हा मात्र त्यांच्या शक्तीपुढे दृष्टांना झुकावेच लागते असा संदेश हा लघुपट देतो. या लघुपट महोत्सवाला न्यायाधीश, महिला वकील, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.