शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सतेज पाटील यांचा सरकारी जागांवर दरोडा

By admin | Updated: April 11, 2015 00:24 IST

महाडिक यांचा पलटवार : ‘गोकुळ’वर शिंतोडे उडवू नका...

कोल्हापूर : ‘गोकुळ’वर हलगी वाजवून आम्ही दरोडा घातला म्हणणाऱ्यांनी देवस्थान व महापालिकेच्या जागांवर हलगी वाजवून दरोडा घालून साम्राज्य उभे केल्याचा पलटवार आमदार महादेवराव महाडिक यांनी पत्रकार परिषदेत केला. जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविलेल्या ‘गोकुळ’वर शिंतोडे उडविणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. यात तुम्ही भस्मसात व्हाल. आरोप करणाऱ्यांनी एका व्यासपीठावर यावे, असे उघड आव्हानही त्यांनी दिले. ‘आमदार महाडिक यांनी ‘गोकुळ’वर हलगी वाजवून १५० कोटींचा दरोडा घातल्या’चा आरोप गुरुवारी सतेज पाटील यांनी केला होता. याला उत्तर देण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार महाडिक बोलत होते. ते म्हणाले, आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी संस्था कशा निर्माण केल्या? महापालिका, देवस्थानच्या जागा हडप करणाऱ्यांनी एका व्यासपीठावर येऊन बोलावे. कोण किती पाण्यात आहे, हे माहीत आहे. कदमवाडी येथील हॉस्पिटलची जागा, नवीन पंचतारांकित हॉटेलची जागा, कसबा बावड्यातील कॉलेजसाठी साडेसात एकरांऐवजी दहा एकर जागा घेतली. विद्यापीठाशेजारील नवीन कॉलेजची जागा महापालिकेकडून कशी घेतली? करार संपूनही वॉटर पार्क ताब्यात कसा? कोल्हापूरपासून मुंबईला जाईपर्यंत या मंडळींचे अनेक प्रताप उघड होतील. मी उकिरडा उकरणार नाही. माझ्या राज्यात मी खूश आहे. ‘गोकुळ’मध्ये टॅँकर नियमानेच येतात-जातात. तसे होत नसेल तर जनता देईल ते शिक्षा भोगण्यास तयार आहे. शेतकऱ्यांच्या बळावर संघाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. त्याच्यावर विनाकारण शिंतोडे उडवू नका. स्वत:च्या कारखान्याच्या सभासदांनाही आपण सभासद आहोत की नाही, हे माहीत नाही, अशा मंडळींनी आमच्या कारखान्याची मापे काढू नयेत. खोटे आरोप केल्याने सत्य झाकोळले जात नाही. महाडिक भिणारा नाही आणि मैदान सोडणारा नाही. ‘राजाराम’ व ‘गोकुळ’चा निकालच विरोधकांना उत्तर देईल, असेही आमदार महाडिक यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष दिलीप पाटील, अरुण नरके, रणजितसिंह पाटील, विश्वास पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर उपस्थित होते. आताच पुळका कसा?आॅडिट दरवर्षी होत असते. विरोधकांना आताच ‘गोकुळ’चा पुळका कसा आला? या अगोदर ते गप्प का होते? असा सवाल करीत अमल महाडिक व रामराजे संचालक मंडळात दिसले असते, असे म्हणणे म्हणजे ‘झोपाळा खाली पडला; त्याखाली बाळ असते तर?’ असे म्हणण्यासारखे आहे, अशी खिल्ली अरुण नरके यांनी उडविली. आइस फॅक्टरीवर मौनकोल्हापूर आइस फॅक्टरी कोणाची, याबाबत विचारले असता, आमदार महाडिक यांच्यासह संचालकांनी मौन पाळले. ही फॅक्टरी कोणाची हे आरोप करणाऱ्याला विचारा, अशा एकेरी भाषेत अध्यक्ष दिलीप पाटील यांनी उत्तर दिले. झोप चुकवत नाही...!नित्यनियमाने दुपारची झोप घेणाऱ्यांची झोप उडाल्याची टीका सतेज पाटील यांनी केली होती. यावर बोलताना, माझी झोप उडालेली नाही. आजही दुपारचे झोपूनच आलो आहे. माझ्या झोपेची काळजी इतर कोणी करू नये, असे प्रत्युत्तर आमदार महाडिक यांनी दिले.