जिल्हा बँक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:22 IST2021-04-18T04:22:59+5:302021-04-18T04:22:59+5:30

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महिला विकास कक्षात या कार्यरत असलेले कर्मचारी प्रशांत प्रकाश नाईक यांचे ...

Sanugrah grant to the families of District Bank employees | जिल्हा बँक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान

जिल्हा बँक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महिला विकास कक्षात या कार्यरत असलेले कर्मचारी प्रशांत प्रकाश नाईक यांचे कोरोनाने निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांना बँकेच्या वतीने पाच लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान आज संचालक भय्या माने यांनी सुपुर्द केले.

कोरोना महामारीच्या काळात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जर कोरोनाने मृत्यू झाला तर त्यांच्या पश्चात कुटुंबाला पाच लाखांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने घेतला आहे. त्यानुसार भय्या माने यांनी हा धनादेश प्रशांत नाईक यांच्या मातोश्री सरोजनी नाईक यांच्याकडे सुपुर्द केला.

यावेळी नाईक कुटुंबीय, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. माने, दिलीप ढोबळे, उपनगराध्यक्ष बाबासो नाईक, पक्षप्रतोद नितीन दिंडे, माजी उपनगराध्यक्ष शशिकांत नाईक, माजी नगराध्यक्ष अजित कांबळे, सुनील कदम, बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

१७ कागल जिल्हा बँक

फोटो कॅप्शन

कोरोनामुळे निधन झालेले प्रशांत नाईक यांच्या कुटुंबीयांना जिल्हा बँकेच्या वतीने पाच लाख रुपयांचा धनादेश भय्या माने यांनी सुपुर्द केला. यावेळी नाईक परिवार व मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Sanugrah grant to the families of District Bank employees