शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: तिसंगीत सांबराची शिकार,  चौघे ताब्यात; एकजण पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 11:38 IST

साळवण: तिसंगी, ता. गगनबावडा येथे सांबराची शिकार केल्याप्रकरणी काल, रविवारी रात्री उशीरा तिघांना गगनबावडा वनविभागाने रंगेहाथ पकडले. सुभाष बापू ...

साळवण: तिसंगी, ता. गगनबावडा येथे सांबराची शिकार केल्याप्रकरणी काल, रविवारी रात्री उशीरा तिघांना गगनबावडा वनविभागाने रंगेहाथ पकडले. सुभाष बापू पाटील (वय ४२), जालिंदर कृष्णात पाटील (३०), विठ्ठल कोंडीबा पाटील (३८, सर्व रा. निवडे, ता. गगनबावडा) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, तिसंगी येथील 'मीटर माळ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जंगल परिसरात मादी जातीच्या गर्भवती असलेल्या 'सांबराची बंदुकीच्या साह्याने शिकार केल्यानंतर मृत सांबराचा शिरच्छेद‌ करताना तिघा संशयितांना गगनबावडा वनविभागाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. यावेळी दोघे बंदूक व शस्त्रासह पसार झाले होते. यातील पांडुरंग बाबू पाटील (४२) हा वनविभाग साळवण दुरक्षेत्र येथे स्वतः हजर झाला असून संशयित संजय लहू पाटील हा बंदुकीसह फरार आहे. वन विभागाने वन्यजीव कायद्याप्रमाणे चौघांवर गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा तपास सुरू आहे. चौघा संशयित आरोपींना आज, सोमवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल प्रियांका भवार, वनपाल संभाजी चरापले, वनरक्षक नितीन शिंदे, ओमकार भोसले, प्रकाश खाडे, वनसेवक धोंडीराम नाकाडे, मुबारक नाकाडे, दादू पाटील, नाथा कांबळे यांनी ही कारवाई केली. पुढील तपास वनक्षेत्रपाल प्रियांका भवार करत आहेत.सांबर गर्भवती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले असता मादी जातीची 'सांबर' गर्भवती असल्याचे लक्षात आले. येत्या आठ दिवसांमध्ये ती आपल्या बाळाला जन्म देणार होती. समोर घडलेला प्रकार बघून वन विभागातील कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग