सकल मराठा समाज मंत्री, आमदार, खासदाराच्या घरासमोर आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:23 IST2021-05-17T04:23:46+5:302021-05-17T04:23:46+5:30

तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीची बैठक कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समन्वय समितीचे उपाध्यक्ष ...

Sakal Maratha Samaj Minister, MLA, MP will protest in front of the house | सकल मराठा समाज मंत्री, आमदार, खासदाराच्या घरासमोर आंदोलन करणार

सकल मराठा समाज मंत्री, आमदार, खासदाराच्या घरासमोर आंदोलन करणार

तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीची बैठक कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समन्वय समितीचे उपाध्यक्ष दीपक कुन्नुरे होते.

या बैठकीमध्ये समिती सदस्य शिवाजीराव माने, पंडित निंबाळकर, दयासागर मोरे, प्रवीण केर्ले, संतोष सावंत, अमित गर्जे, पुंडलिक बिरंजे, मिलिंद ढवळे-पाटील यांनी आपल्या मनोगतात विशेष बाब म्हणून मराठा समाजास सोयी-सवलतींचा लाभ मिळवून न्याय द्यावा; अन्यथा मराठा समाजाच्या संयमाचे रूपांतर उद्रेकात होईल, असा इशारा दिला.

या बैठकीला नगरसेवक दीनानाथ मोरे, उत्तम देसाई, अरविंद माने, विजय पाटील, अमोल चव्हाण, कृष्णात जाधव, शशिकांत वाळक, एल. बी. पाटील, दत्तात्रय सासवडे, विजय पाटोळे, आदी उपस्थित होते.

Web Title: Sakal Maratha Samaj Minister, MLA, MP will protest in front of the house