शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात सद्भावना दौड, कन्हैयाकुमार यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 16:41 IST

शेतकरी मेळाव्याचे आयोजन

कोल्हापूर : माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त रविवारी आमदार पी. एन. पाटील यांच्या पुढाकाराने सद्भावना दौड व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौड व शेतकरी मेळाव्यास काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस प्रभारी कन्हैयाकुमार यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.आमदार पाटील यांच्या वतीने प्रत्येक वर्षी २० ऑगस्टला माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दौड काढण्यात येते. या वर्षी रविवारी सकाळी साडेनऊ वाजता दसरा चौक येथून दीप प्रज्वलन करून सद्भावना दौडला सुरुवात होईल. माजी मंत्री व काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या दौडचा प्रारंभ होईल. यावेळी कन्हैयाकुमार, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार उल्हास पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, श्रीपतरावदादा सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या दौडचा मार्ग दसरा चौक, बिंदूचौक, मिरजकर तिकटी, पाण्याचा खजिना, संभाजीनगर, कळंबा ते दिंडनेर्ली सूतगिरणी असा आहेे. सूतगिरणी स्थळावर शेतकरी मेळावा होणार आहे. मेळाव्यात मान्यवर नेते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यास मोठ्या संख्येने काँग्रेसप्रेमी जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRajiv Gandhiराजीव गांधीcongressकाँग्रेसkanhaiya kumarकन्हैय्या कुमार