रुई ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:25 IST2021-05-19T04:25:54+5:302021-05-19T04:25:54+5:30

सुनील चव्हाण हा ग्रामपंचायतीकडील कचरा टाटा एस टेंपो (नं. एम. एच. ०९, ई. एल. ३२०५) तून विहिरीत टाकून परत ...

Rui Gram Panchayat employee beaten | रुई ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास मारहाण

रुई ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास मारहाण

सुनील चव्हाण हा ग्रामपंचायतीकडील कचरा टाटा एस टेंपो (नं. एम. एच. ०९, ई. एल. ३२०५) तून विहिरीत टाकून परत येत असताना संजय चौगुले व एक अनोळखी व्यक्ती या दोघांनी त्याला वाटेत अडविले व टेंपोतून बाहेर ओढून शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व टेंपोची पुढील काच हाताने व खुरप्याने फोडून दरवाजा वाकवून टेंपोचे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान केले अशी फिर्याद सुनील चव्हाण यांनी हातकणंगले पोलिसांत दिली आहे. याबाबत पोलिसांनी संजय चौगुले व एक अनोळखी व्यक्ती या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Rui Gram Panchayat employee beaten