बेळगावमध्ये १९ फेब्रुवारीपासून ‘रोटरी युथ लीडरशीप अवॉर्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:41 IST2021-02-06T04:41:55+5:302021-02-06T04:41:55+5:30

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १९ ते २१ ...

Rotary Youth Leadership Award in Belgaum from February 19 | बेळगावमध्ये १९ फेब्रुवारीपासून ‘रोटरी युथ लीडरशीप अवॉर्ड’

बेळगावमध्ये १९ फेब्रुवारीपासून ‘रोटरी युथ लीडरशीप अवॉर्ड’

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान बेळगाव येथील एका रिसॉर्टमध्ये ‘रोटरी यूथ लीडरशीप अवॉर्ड’ शिबिर होणार आहे. या उपक्रमाचे यंदाचे नववे वर्ष असल्याची माहिती ‘रोट्रॅक्ट क्लब’चे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने १८ ते ३० वयोगटातील युवावर्गासाठी हे शिबिर आयोजित केले आहे. त्यामध्ये तीन दिवस नेतृत्व, संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास आदींबाबतचे विविध उपक्रम राबविण्यात येतील. विविध स्पर्धा होणार आहेत. त्यातील विजेत्या स्पर्धकांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ‘स्पायसिंग अप विथ रूट्‌स’ ही यंदाच्या शिबिराची संकल्पना असल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले. या शिबिरातील सहभाग आणि अधिक माहितीसाठी युवक-युवती, स्पर्धकांनी प्रकल्प अधिकारी प्रत्युष दोषी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अक्षय पुरोहित यांनी केले. यावेळी यश पारेख, अस्मिता शहा, मृण्मयी वडगावकर, जयेश गांधी उपस्थित होते.

Web Title: Rotary Youth Leadership Award in Belgaum from February 19