शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

...तर टोकाची भूमिका : राजू शेट्टी

By admin | Updated: October 8, 2015 01:04 IST

याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनी याबाबत कारखानदारांना परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले.

कोल्हापूर : एकरकमी ‘एफआरपी’ देणे कायद्याने बंधनकारक असताना साखर कारखानदार त्याचे तुकडे पाडणार असतील, तर ते खपवून घेणार नाही. एकंदरीत गेल्या सहा-सात महिन्यांतील सरकारची भूमिका पाहिली तर कारखानदारांना पाठीशी घालणारी आहे, असाच संशय येतो. अशीच भूमिका घेणार असाल तर आम्हालाही टोकाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सत्तेपेक्षा शेतकऱ्यांचे हित महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. साखर कारखान्यांनी टप्प्याटप्प्याने ‘एफआरपी’ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला शेतकरी संघटनांनी विरोध केला असून, त्याविरोधात १६ आॅक्टोबरला ‘स्वाभिमानी’ने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चाचे नियोजन केले आहे. याबाबत खासदार राजू शेट्टींशी संपर्क साधला असता ते म्हणाले, साखर कारखान्यांच्या सर्वसाधारण सभेत कारखानदारांनी टप्प्याटप्प्याने ‘एफआरपी’ देण्याचा ठराव करून घेतला आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनी याबाबत कारखानदारांना परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले. परंतु, एकंदरीत गेल्या पाच-सहा महिन्यांतील सरकारची भूमिका पाहता त्यांचीही कारखानदारांच्या भूमिकेला मूक संमती असल्याचे दिसते. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कारखानदारांना सरकार पाठीशी घालणार असेल तर आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी लागेल. सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही, सरकारमध्ये असलो काय आणि नसलो काय? आमच्या दृष्टीने शेतकरी महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांच्या हितापुढे कधीही तडजोड केली नाही आणि करणारही नाही. याचे भान कारखानदार व सरकारनेही ठेवावे, असा इशारा शेट्टी यांनी दिला. (प्रतिनिधी)५० हजार शेतकऱ्यांच्या सह्यांची मोहीमशेतकऱ्यांनी सर्वसाधारण सभेत मान्यता दिली असेल तर संघटनेला काय हरकत, अशी भूमिका कारखानदारांनी घेतली आहे. यासाठी आम्हीही गावोगावी शेतकऱ्यांना भेटून ‘एफआरपी’बाबत भूमिका जाणून घेण्याची मोहीम उघडली आहे. यामध्ये शेतकऱ्याचे नाव, साखर कारखान्यांचे नाव, सभासद, ऊस उत्पादक, अशी सर्व माहिती घेण्यात येणार असून, तुम्हाला एकरकमी ‘एफआरपी’ पाहिजे की टप्प्याटप्प्याने, असेही विचारले जाणार आहे. जिल्ह्यातून ५० हजार शेतकऱ्यांच्या सह्यांची मोहीम घेतली असून, यासह प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.