शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

फोर्ड कॉर्नर येथील रस्ता खुला, ठेकेदाराकडून मुदतीमध्ये चॅनेलचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 16:00 IST

फोर्ड कॉर्नर येथील जुना पेट्रोल पंप येथे आर. सी. सी. चॅनल करण्याचे काम पूर्ण झाले असून शनिवारपासून रस्ता खुला करण्यात आला आहे. रस्ता बंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. तसेच परिसरातील व्यावसायिकांना फटका बसत होता. सव्वा महिन्यानंतर हा रस्ता पूर्ववद सुरु झाला आहे.

ठळक मुद्देफोर्ड कॉर्नर येथील रस्ता खुलाठेकेदाराकडून मुदतीमध्ये चॅनेलचे काम पूर्ण

कोल्हापूर : फोर्ड कॉर्नर येथील जुना पेट्रोल पंप येथे आर. सी. सी. चॅनल करण्याचे काम पूर्ण झाले असून शनिवारपासून रस्ता खुला करण्यात आला आहे. रस्ता बंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. तसेच परिसरातील व्यावसायिकांना फटका बसत होता. सव्वा महिन्यानंतर हा रस्ता पूर्ववद सुरु झाला आहे.फोर्ड कॉर्नर ते टायटन शोरूम परिसर हा सखल भागात असल्यामुळे जरा जरी पाऊस झाल्यास येथे चार ते पाच दिवस पाणी साठून राहत होते. अनेकांच्या घरांमध्ये तसेच दुकानांमध्येही पाणी शिरत होते. उमा टॉकीज, अयोध्या टॉकीज परिसरातील सांडपाणी येथील ड्रेनेज लाईनमधून जाते.

सखल भाग आणि जुन्या लाईनमुळे वारंवार गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावर येत होते. यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने निधी मंजूर करून येथे आर. सी. सी. चॅनल करण्याचे काम ५ नोव्हेंबरपासून सुरू केले. दीड महिन्यांत काम पूर्ण होणार होते. ठेकेदाराने मुदतीच्या आतच काम पूर्ण केले.

 

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकkolhapurकोल्हापूर